महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar ) काल ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat )या ‘बिग बजेट’ ऐतिहासिक सिनेमाची घोषणा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या सिनेमाची घोषणा करण्यात आली आणि घोषणा होताच या चित्रपटाची चर्चा सुरू झाली. कारण अक्षय कुमार. होय, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी सिनेमात अक्षय कुमार (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. मांजरेकरांची छत्रपती शिवरायांच्या भूमिकेसाठी अक्षयची निवड केली असली तरी नेटकऱ्यांना मात्र ही निवड फारशी आवडलेली नाहीये. त्यामुळे सध्या मांजरेकर आणि अक्षयला ट्रोल केलं जात आहे. पण मांजरेकरांना अक्षयचं हवा होता. कारण...? ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत मांजरेकरांनी याचा खुलासा केला आहे.
मी सात वर्षे वणवण फिरलो...‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमाची घोषणा करताना माझा आनंद गगणात मावेनासा झालाये. कारण मी 7 वर्षे वणवण फिरलो या सिनेमासाठी. पण बरं झालं, त्यामुळे या सिनेमात ग्रोथही होत गेली, असं मांजरेकर म्हणाले.
मला आशुतोष गोवारीकरचा फोन आला...मला एकदा आशुतोष गोवारीकरचा फोन आलेला. म्हणाला, अरे महेश तू तो सात... सिनेमा करतोय का? मी करायचं म्हणत होतो. मी म्हटलं, नाही रे मी करतो आहे. खरं तर हा सिनेमा कोणीही करू शकलं असतं. कारण तसे राईट्स नव्हते माझ्या हातात. पण मी आशुतोषचे आभार मानेल. कारण तू करतो आहेस ना मग बास्स...संपलं, असं म्हणून त्याने नंतर कधी विषय काढला नाही, असंही मांजरेकरांनी सांगितलं.
शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षयचं का?शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षयचं का? असा प्रश्न केल्यावर ते म्हणाले, मी कोणालाही घेतलं असतं तरी हाच प्रश्न मला विचारला गेला असता. पण तरिही मी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला माहित आहेत. पण मला या देशाच्या कानाकोपºयात जगभरात त्यांना पोहोचवायचे होते. त्यामुळे मला असंच एक कॅरक्टर हवं होतं. आता हे कॅरेक्टर करणार तर कोण? तर एक क्लिन इमेज असलेला, स्वत:ची प्रत्येक गोष्टीत काळजी घेणारा कोण आहे तर अक्षय कुमार. एक तर त्याचं धारदार नाक हे एक कारण आहे. मी त्यांना जाऊन भेटलो, त्यांनी गोष्ट ऐकली आणि मी करणार, असं ते मला म्हणाले.