अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा राहतात का वेगळे?, चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्रींने दिले होते असे काही उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 01:32 PM2021-05-24T13:32:04+5:302021-05-24T13:32:45+5:30
अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्राची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अमृताने हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत लग्न केले आहे. एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, गेल्या काही बऱ्याच दिवसांपासून अमृता मुंबईत तर हिमांशू दिल्लीत राहतो आहे. खरेतर हिमांशू मुंबई-दिल्लीला ये-जा करत असतो. करवा चौथच्या दरम्यान तो दिल्लीत होता. त्यावेळीअमृता आणि हिमांशू आपल्या इंस्टाग्रामवरून लाइव्ह आले होते. त्यावेळी दोघांनीही आपल्या नात्यातील गमतीजमती चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या.
एका चाहत्याने अमृताला तुम्ही वेगळे का राहता असा प्रश्न केला होता. त्यावेळी अमृता म्हणाली होती की, ‘मी कामानिमित्त मुंबईत आहे अगदी दिवळीतही मी पूर्णपणे बिझी असून केवळ एकच दिवस मी सुट्टी घेतली आहे. तर हिमांशू त्याच्या आईला भेटायला दिल्लीला गेला आहे.’
तसेच हिमांशूने २००४ साली पहिल्यांदा अमृताची भेट कशी झाली याचीही आठवण करून दिली. आम्ही दोघे एकमेकांना गेल्या १७ वर्षांपासून ओळखत आहोत. डबु रत्नानी यांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा आम्ही दोघे भेटलो होतो तिथेच सिद्धार्थने आमची ओळख करून दिली. आमच्या दोघांमध्ये आजही भांडणे होतात असे म्हणत अमृताने सांगितले की हिमांशू खूप शांत तर मी खूपच मस्तीखोर आहे. मी त्याच्यासोबत कधीच काम करू शकत नाही अगदी दोन मिनिटंही मी त्याच्यासारखी शांत बसू शकत नाही.
हिमांशू मल्होत्रा नेहमीच आपल्या इन्स्टाग्रामवरून चाहत्यांशी संवाद साधत असतो. आपल्या बोलण्यातून तो नेहमीच या चाहत्यांना प्रेरणा देताना दिसतो. चाहत्यांकडूनदेखील त्याला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो.