मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अमृताने हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत लग्न केले आहे. एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, गेल्या काही बऱ्याच दिवसांपासून अमृता मुंबईत तर हिमांशू दिल्लीत राहतो आहे. खरेतर हिमांशू मुंबई-दिल्लीला ये-जा करत असतो. करवा चौथच्या दरम्यान तो दिल्लीत होता. त्यावेळीअमृता आणि हिमांशू आपल्या इंस्टाग्रामवरून लाइव्ह आले होते. त्यावेळी दोघांनीही आपल्या नात्यातील गमतीजमती चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या.
एका चाहत्याने अमृताला तुम्ही वेगळे का राहता असा प्रश्न केला होता. त्यावेळी अमृता म्हणाली होती की, ‘मी कामानिमित्त मुंबईत आहे अगदी दिवळीतही मी पूर्णपणे बिझी असून केवळ एकच दिवस मी सुट्टी घेतली आहे. तर हिमांशू त्याच्या आईला भेटायला दिल्लीला गेला आहे.’