Join us

... यापुढे नाटकात काम करणार नाही, सुबोध भावेचा संताप अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 9:53 PM

नाटकादरम्यान प्रेक्षकांचे मोबाईल सतत वाजत असल्याने अभिनेता सुबोध भावे यांचा राग काहीसा अनावर झाला आहे.

ठळक मुद्देसध्या सुबोध भावे यांच्या 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. नाटक काय टीव्हीवर पण बघता येईल, असा संताप सुबोधने व्यक्त केला आहे. 

मुंबई - तुला पाहते रे या मालिकेतून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेले अभिनेता सुबोध भावे यांचा संताप अनावर झाला आहे. नाटकादरम्यान प्रेक्षकांचे मोबाईल सतत वाजत असल्याने अभिनेता सुबोध भावे यांचा राग काहीसा अनावर झाला आहे. त्यामुळे त्याने प्रेक्षकांचे मोबाईल असेच वाजत राहणार असतील तर नाटकात काम करणार नाही असा इशारा दिला आहे. सध्या सुबोध भावे यांच्या 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. या प्रयोगादरम्यान अनेकदा प्रेक्षकांचे मोबाईल फोन वाजून नाटकादरम्यान व्यत्यय येत असल्याने सुबोधने त्याच्या फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून संताप व्यक्त केला आहे. नाटक सुरू होण्यापूर्वी अनेकदा विनंती केल्यानंतरही नाटक सुरू झाल्यावर मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज वाटत नाही. यावर उपाय एकच. या पुढे नाटकात काम न करणं. म्हणजे त्यांच्या फोनच्यामध्ये आमची लुडबूड नको. कारण फोन जास्त महत्त्वाचा. नाटक काय टीव्हीवर पण बघता येईल, असा संताप सुबोधने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :सुबोध भावे ट्विटरफेसबुकमुंबई