अभिनेत्री सोनाली खरे (sonali khare) हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे. मुळची डोंबिवलीची असलेली सोनाली खरे उत्तम नृत्यांगनाही आहे. सोनालीने हिंदी अभिनेता बिजय आनंदसोबत विवाह केला आहे. त्यांना एक मुलगी आहे, जिचं नाव आहे शनाया. शनायाने नुकतेच मायलेक सिनेमातून पदार्पण केले. दरम्यान सोनाली खरे हिने नुकतेच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. त्यात तिने रिलेशनशीपवर भाष्य केले.
सोनाली खरे म्हणाली की, आयुष्यात तुम्हाला पार्टनर हवा असतो बरोबर. ज्या पार्टनरसोबत तुम्हाला प्रत्येक आयुष्यातली गोष्ट शेअर करायची असते. एन्जॉ. करायची असते आणि तरच ते रिलेशनशीप चांगले टिकते. कारण त्या नात्यामध्ये ना तुम्ही एक तुम्ही माणूस म्हणून वाढ झाली पाहिजे. नुसतंच जगताय. एकमेकांबरोबर राहताय हे ही तसं नाहीये. हो पण मी पाहिलंय की मी या नात्यामध्ये खूप ग्रो होतेय मला खूप काही शिकायला मिळतंय. दिवसेंदिवस चांगली माणूस बनतेय आणि ती देवाण-घेवाण पण एका नात्यात गरजेची असते.
सोनाली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच काही रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली आहे. सोनालीचा पूर्वीपेक्षा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. सोनालीने निर्मिती श्रेत्रात काही दिवसांपूर्वी पदार्पण केलं आहे.