Join us

भ्रष्टव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या स्त्रीचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 6:57 AM

आतापर्यंत स्त्रीला मध्यभागी ठेवून अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. असाच आणखीन एक चित्रपट 'माझा एल्गार' 10 नोव्हेंबला प्रेक्षकांच्या ...

आतापर्यंत स्त्रीला मध्यभागी ठेवून अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. असाच आणखीन एक चित्रपट 'माझा एल्गार' 10 नोव्हेंबला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. ज्यात भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध एका स्त्रीने केलेल्या संघर्षाची कहाणी मांडण्यात येणार आहे. याचित्रपटाच्या निमित्ताने माझ्या एल्गारच्या टीमने लोकमत ऑफिसला भेट दिली यावेळी त्यांच्या टीमशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा.  ऐश्वर्या-  तुझा हा पहिलाच चित्रपट आहे, त्यामुळे शूटिंग दरम्यानचा तुझा अभुनव कसा होता ?चित्रपटानंतर प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन खूप बदलला आहे. या आधीची ऐश्वर्या ऐकेरी विचार करायची मात्र आताची ऐश्वर्या खूप वेगवेगळ्या बाजूनी विचार करायला लागली आहे. कोणत्याही गोष्टी बाबत ती आता पटकन निर्णय घेत नाही. या भूमिकेत आणि ऐश्वर्या राजेशमध्ये बरीच तफावत आहे. ऐवढे मात्र नक्कीच सांगेन या भूमिकेने मला खूप काही शिकवले. यश-  यातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील ?मी या चित्रपटात मनोजची नावाची भूमिका साकारतो आहे. माझ्या भूमिकेला एक वेगळीच शेड आहे. मनोज एक सेट्ल्ड मुलगा आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते मात्र या चित्रपटात एका यशस्वी स्त्री मागे एक पुरुष आहे. यापेक्षा मी माझ्या भूमिकेबाबत तुम्हाला जास्त काही रिव्हिल करु शकत नाही.दिग्दर्शक मिलिंद कांबळे - या चित्रपटाचे कथानक तुमच्यापर्यंत कसे पोहोचले ?या चित्रपटाची कथा समाजामध्ये घडत असणारी आहे. मी एका वर्तमान पत्रामध्ये बातमी वाचली होती. नाशिकमध्ये एक आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची. या बातमीचा धागा पकडून मी चित्रपटाची कथा रचली. मात्र हि कथा वर्तमान पत्रातील बातमीपेक्षा खूप नाविन्यपूर्ण आहे. स्त्रीच्या जगण्याचा संघर्ष यात दाखवण्यात आलेला आहे. तसेच स्त्रीने कसे जगावे याचा एक संदेश आम्ही यातून देण्याचा प्रयत्न केला आहे. ऐश्वर्या -तुझ्या चित्रपटाच्या शूटिंगचा पहिला दिवस कसा होता ?संमिश्र प्रतिक्रिया होत्या माझ्या. मी नव्हर्स होते, एक्सायडेट  होते आणि थोडीशी टेन्शनमध्ये सुद्धा होते. मात्र ज्यावेळी मी पहिल्यांदा कॅमेरा फेस करायला जात होते. तेव्हा मी आमच्या निर्मात्यांना श्रीकांत सरांना नमस्कार करायला गेली  त्यावेळी त्यांनी मला ज्या गोष्टी सांगितल्या त्या खूपच प्रेरणादायी होत्या. सर मला म्हणाले कि, अजिबात घाबरु नकोस, कोणत्याही गोष्टीचे दडपण घेऊ नकोस. फक्त ऐवढाच विचार कर ही भूमिका तू जगणार आहेस. त्यांच्या या एका वाक्याने माझ्यात आत्मविश्वास आला, एक वेगळीच प्रेरणा मला मिळाली आणि त्यानंतर मी कॅमेरासमोर गेले त्यावेळी मी खूपच शांत झालेले होते. तसेच माझा पहिला शॉर्ट वन टेक ओके झाला होता.  दिग्दर्शक मिलिंद कांबळे - चित्रपटातील चार वेगवेगळ्या जॉनर घेण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली ?चित्रपटाची सुरुवात विठ्ठलाच्या अभंगाने होते. या अभांगापासून चित्रपटाची खरी सुरुवात झाली आहे. दुसरे आम्ही या लव्ह साँग घेतले. हे लव्ह साँग ही अत्यंत वेगळ्या पद्धतीचे आहे. या चित्रपटाचे वैशिट्य म्हणजे यात फक्त चित्रपटाचे पात्र नाही तर चित्रपटात बॅग ग्राऊंडला दिलेले संगीत ही बोलते. ते कशा प्रकारे बोलते हे तुम्हाला चित्रपट रिलीज झाल्यावर कळेलच. ऐश्वर्या- तुला बायोपिकमध्ये काम करायला आवडले ?या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान माझे आणि दिग्दर्शकांसोबत याच विषयावर चर्चादेखील झाली होती. माझे तीन ड्रीम रोल्स आहेत. त्यातील पहिला भूमिका आहे 'माणिकर्णिका अर्थात झाशीची राणी, दुसरी भूमिका आहे द्रौपदीची तर तिसरी भूमिका आहे राधा. या तिन्ही भूमिका मला करायला खूप आवडतील. कारण या तिन्ही भूमिका खूप आव्हानात्मक आहेत असे मला वाटते. तसेच त्या खूप वेगळ्या देखील आहेत. त्यांच्या संघर्षाची कहाणी मला पडद्यावर मांडायला खूप आवडेल.