Join us

महिलांनी अधिक जागृत होणे गरजेचे -सायली संजीव !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 1:33 PM

विविध मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहचलेली सायली संजीव अभिनयाबरोबर एका संस्थेच्या वतीने मासिक पाळी संदर्भात जनजागृतीचे काम करत आहे. सायली आगामी काळात या विषयावर चर्चा सत्र (गप्पा टप्पा) चे काही कार्यक्रम तालुका पातळीवर आयोजित करणार आहे. खास ‘लोकमत’साठी काही शोज करता आले तर आनंदच होईल, असे ती म्हणाली. एकंदरीत याविषयी तिच्याशी मारलेल्या मनसोक्त गप्पा..

-रवींद्र मोरेविविध मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहचलेली सायली संजीव अभिनयाबरोबर एका संस्थेच्या वतीने मासिक पाळी संदर्भात जनजागृतीचे काम करत आहे. सायली आगामी काळात या विषयावर चर्चा सत्र (गप्पा टप्पा) चे काही कार्यक्रम तालुका पातळीवर आयोजित करणार आहे. खास ‘लोकमत’साठी काही शोज करता आले तर आनंदच होईल, असे ती म्हणाली. एकंदरीत याविषयी तिच्याशी मारलेल्या मनसोक्त गप्पा..* आता पर्यंत तुझी ओळख अभिनेत्री म्हणून आहे, मात्र तू इतरही उपक्र मात कार्यरत आहे, तर याबाबत काय सांगशिल?- एकतर ७ वी, ८ वी पासून माझ्या डोळ्यासमोर अशा गोष्टी घडत गेल्या की, ज्यामुळे मी ठरविले की, मासिक पाळीसंदर्भात पुढे जाऊन काहीतरी करावे. त्यावेळी मी आईला, आजीला पाहायचे आणि त्यावेळी असे वाटायचे की आपण किती अंधश्रद्धेचे बळी पडतोय. मुळात जी गोष्ट असायला हवी ती बाजुलाच राहते. या चार दिवसात स्वत:ची आरोग्याची काळजी न घेता, शास्त्रीय आधाराला बाजूला सारुन आपण कसे फक्त परंपरेचे बळी पडतोय हे पाहून खूपच कसेच वाटायचे. म्हणून तेव्हाच ठरविले होते की, याबाबतीत काहीतरी करायचंय. त्यातच अभिनेत्री झाल्याचा फायदा झाला कारण ह्या गोष्टी मांडायला मला एक चेहरा मिळाला आहे. कारण अभिनेत्यांनी एखादा विचार केला तर त्याचे चाहते डोळे झाकून नक्की फॉलो करतात. म्हणून मी मासिक पाळीसंदर्भात मी एका संस्थेत काम करतेय. या कामास खूपच उदंड प्रतिसाद मिळू लागला. शिवाय कॅन्सर रुग्णांनाही मदत करण्याचे काम माझे सुरु आहे.* या संदर्भात आजपर्यंत किती कार्यक्रम झाले ?- मी गेल्या वर्ष-दिड वर्षापासून काम करत आहे. माझे या संदर्भात तीन-चार लेक्चर झाले आणि त्याला खूपच चांगला प्रतिसादही लाभला.* समाजात स्त्रीयांच्या बाबतीत काय बदल घडायला हवेत, असे तुला वाटते?- मुळात समाजात खूप झपाट्याने बदल घडतायत. असा काही वेगळा बदल घडावा असे नाही पण सगळे बदल आपण स्वीकारतो. जसे इंटरनेट, सोशल मीडिया यासारख्या माध्यमांचा वापर सहज करु लागलोय. मात्र अजूनही काही प्रमाणात परंपरागत चाललेली अंधश्रद्धा आपण फॉलो करतोय, हे कुठेतरी थांबायला हवे. कारण जग बदलतेय, त्यानुसार बदल घडवायला हवे.* अलिकडेच ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा झाला, यानिमित्ताने महिलांना काय सांगशिल?- मी सध्या मासिक पाळी संदर्भात जे लेक्च र घेतेय, त्यात प्रश्न विचारले जातात. या सर्वच प्रश्नाचे उत्तरे माझ्याजवळ आहेत. कारण मी तेवढा अभ्यास केला आहे. महिलांनी याबाबत अभ्यास केला तर त्यांनाही या प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतात. महिलांना एकच सांगू शकते की, या दिवसात अंधश्रद्धा फॉलो करण्यापेक्षा महिलांनी आरोग्याची, स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी, सॅनिटरी नॅपकिन किती वेळाने बदलायला हवे, व्यायाम किती करायला हवा, या दिवसात काय खायायला हवे, किती आराम करायला हवे याबाबत अभ्यास करायला हवा.* तुझे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत?- यावर्षी तीन-चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. शिवाय मी लवकरच वेबसिरीजही करणार आहे. तशी याबाबत चांगली बातमी आपणास ऐकायला मिळेलच.

टॅग्स :सायली संजीव