Join us

​यतीन कार्येकर आणि स्नेहा रायकर झालेत फुल टाईट, दुसरी मराठी वेब सिरीज रसिकांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:42 AM

मैत्री, प्रेम आणि पालकत्व अशा संकल्पनांना स्पर्श करणारी फुल टाइट ही मालिका विनोदी अंगाने जाणारी आहे.

तब्बल 180.3 दशलक्ष इतकी ऑनलाइन व्हिडिओची प्रेक्षकसंख्या आणि जवळजवळ 4 दशलक्ष नोंदणीकृत सदस्य असलेल्या ओटीटी कंपनीने, प्रादेशिक बाजारपेठांमधील विकासाला चालना देण्यासाठी भाषा संहितांमध्ये आज मोठी गुंतवणूक केली आहे. केपीएमजी आणि गुगलच्या 2017 मधील अहवालानुसार, भारतीय भाषिकांनी डिजिटल करमणुकीचा इतरांपेक्षा फारच लवकर स्वीकार केला आहे आणि भविष्यात ही संख्या वाढती राहणार आहे.

या सूक्ष्मदर्शी प्रेक्षकांना सेवा देण्यासाठी सोनी लिवने `फुल टाइट’ नावाची मराठी वेबसिरीज आज सादर करून प्रादेशिक संहितेत भर घातली आहे. फुल टाइट या सात भागांच्या वास्तवदर्शी मालिकेचे दिग्दर्शन श्रीपाद पवार या तरुण दिग्दर्शकाने केले आहे तर विजय बारसे यांनी निर्मिती केली आहे. या वेब सिरीजमध्ये यतीन कार्येकर आणि स्नेहा रायकर यासारखे लोकप्रिय कलाकार आहेत, त्यांच्याबरोबर अक्षय केळकर, सायली साळुंखे, वनश्री जोशी आणि सुमुखी पेंडसे आदी कलाकारही काम करत आहेत.

मैत्री, प्रेम आणि पालकत्व अशा संकल्पनांना स्पर्श करणारी फुल टाइट ही मालिका विनोदी अंगाने जाणारी आहे. एक परफेक्ट कुटुंब दिसणाऱ्या या घरात आदीचे (अक्षय केळकर) त्याच्या पालकांशी (यतीन कार्येकर आणि स्नेहा रायकर) फारच विचित्र मुद्द्यांवरून वाद होत असतात. सगळं काही ठीक चाललेलं असताना, वडिल आणि मुलगा एका संध्याकाळी एकत्र दारू घेतात आणि सगळं बिघडून जातं. आयुष्यातील वेडीवाकडी वळणं, उपरोधिक गोष्टी या सगळ्यांचा या सुंदर पटकथेत सुरेख मेळ साधण्यात आला आहे.

सोनी लिवची फुल टाइट ही दुसरी वेब सिरीज आहे, यापूर्वी `योलो – यू ओनली लिव वन्स’ या सिरीजला भरघोस प्रतिसाद लाभला होता. 18 जुलै पासून सुरू झालेली  ही सिरीज दर बुधवारी इंग्रजी उपशीर्षकांसह येणार आहे. Lokmat.com या वेबसिरीजचे मी़डिया पार्टनर आहेत.