सध्या युट्यूबवर आपल्या गावरान भाषेतील व्हिडीओंनी विनायक माळी या तरुणाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्याच्या प्रत्येक व्हिडिओला हजारोने लाईक मिळतात. त्याचा पुढचा व्हिडिओ कधी पोस्ट करणार याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. विनायक हा प्रसिद्ध युट्यूबर आणि आगरी कॉमेडीअन आहे. आगरी भाषेत असणारे हे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून विनायकला आगरी किंग असे म्हटले जाते.
विनायक माळीने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रायगडमधील पनवेलमध्ये विनायकचा सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला. आगरी कुटुंबात जन्मलेल्या विनायकचे व्हिडिओदेखील याच भाषेतील असतात. विनायक माळीचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. नोकरीच्या निमित्ताने त्याचे वडील ठाण्यात वास्तव्यास असल्याने त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण ठाण्यातच झाले. त्याने वकिलीचे शिक्षण घेतले आहे. विनायक माळीने सुरुवातीला युट्यूबवर हिंदी भाषेत व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली होती. पण त्याला त्यात अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे त्याने आगरी भाषेत व्हिडिओ करायला सुरुवात केले. हे व्हिडिओ लोकांनी अल्पावधीत डोक्यावर घेतले. विनायकला अभिनयासोबत डान्स आणि गाण्याचीही प्रचंड आवड आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटर तो अनेकदा डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतो. विनायक माळी युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून महिन्याला जवळपास दीड ते दोन लाख रुपये कमवतो. युटुयुबकडून त्याला सिल्वर बटन देखील मिळालेले आहे.
विनायकच्या युट्यूब चॅनलेवर आगरी भाषेत कॉमेडी व्हिडिओ असतात. जे प्रेक्षकांना प्रचंड आवडतात आणि मोठ्या प्रमाण ते व्हिडिओ शेअरही होत असतात. विनायकाच्या युट्यूब चॅनेलला 1.89 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. चार वर्षांपासून विनायक या युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ पोस्ट करत आहे.