अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेमुळे बराच चर्चेत आहे. मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट अॅण्ड पाहायला मिळत आहेत. अनेक वर्षांनी त्याने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. या मालिकेत एका उद्योगपतीची भूमिका साकारतोय. मालिकेत ज्याप्रमाणे तो आलिशान घरात व महागड्या कारमध्ये फिरताना दिसतो. तसेच अगदी खऱ्या आयुष्यात देखील श्रेयस महागड्या कारचा शौकिन आहे. त्याच्याकडे गाड्यांचे खूप मोठं कलेक्शन आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये ऑडीपासून मर्सिडेज बेन्झ या महागडया कार्सचा समावेश आहे. ज्या कार्सची किंमत कोटींच्या घरात आहे. आज आपण श्रेयसच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत.
श्रेयसकडे मर्सिडिज बेन्झ इ क्लास ही महागडी कार आहे. याची किंमत ९४ लाखांच्या घरात आहे. त्याच्याकडे मर्सिडिज बेन्झ जीआयएस ही महागडी कार देखील असून या कारची किंमत १.१६ कोटींच्या घरात आहे. मर्सिडिज शिवाय त्याच्याकडे 'ऑडी Q7' ही कार आहे. याची किंमत ७० लाख एवढी आहे.
तर ऑडीमध्ये 'ऑडी ए८एल' ही कार सुद्धा त्याच्याकडे आहे. याची किंमत १.२३ कोटी इतकी आहे. श्रेयसकडे 'होंडा अकॉर्ड' ही कार सुद्धा आहे. ज्याची किंमत ३५ लाख एवढी आहे. किया सेल्टोस ही कार देखील त्याच्याकडे आहे. या कारची किंमत १५ लाख इतकी आहे.
श्रेयस सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. तो लवकरच अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत आपडी थापडीमध्ये दिसणार आहे...२०२१ आणि २२ हे वर्ष श्रेयससाठी खूप खास होते. तसेच श्रेयस देशभरात चर्चेत आला. त्याला कारणही तसे खास आहे. त्याने पुष्पामध्ये अल्लू अर्जूला आवाज दिला आहे.