आपला दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. मराठी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती, हिंदी चित्रपट आणि अनेक मराठी नाटकांत काम केले आहे. हिंदी, मराठीतच नाही तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. एक उत्तम माणूस असणाऱ्या अभिनेता सयाजी शिंदे ज्याला पाहून प्रत्येकाला वाटतं मराठी मातीतला सुपरस्टार सयाजी शिंदे.
अभिनेत्यासह ते निर्माते देखील आहेत.आज करोडोंची संपत्ती असणाऱ्या सयाजी शिंदे यांचे पाय आजही जमिनीवरच आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये. त्यांचे राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे.आजही सामान्य आयुष्य जगणेच पसंत करतात.
मुळात नेहमी ते एक गोष्ट सांगतात, कितीही पैसा आणि सुखसोयी असल्या तरी माणसाला शांती आणि समाधान हवे असते ते विकत मिळत नाही. पण झाडाखाली बसला तर या दोन्ही गोष्टी मिळतात. कोट्यवधी रुपयांच्या गाडीत बसल्यानंतरही जेव्हा गाडीबाहेर उतरतो, त्यावेळी आपण गाडीही झाडाखाली लावायला सांगतो. मग पैसा महत्त्वाचा की झाड?
सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम सर्वश्रूत आहे. यापूर्वीही त्यांनी वृक्ष लागवडीबाबत अनेक उपक्रम घेतले आहेत. झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत व प्रत्येक गाव, तालुक्यातील सर्वात जुनी झाडे हेच त्या त्या भागातील आपले सेलिब्रेटी आहेत, आईनंतर वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देऊन जगवतात, त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्येकी पाच झाडे तरी लावून वाढवली पाहिजेत अनेक कार्यक्रमातून सयाजी शिंदे झाडाचं महत्त्व पटवून देताना दिसतात.