‘युथ’चा संगीत सोहळा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2016 6:24 AM
तरुणाईचा सळसळता उत्साह, जोश आणि बदल घडवण्याची मजबूत इच्छा याला कोणी रोकू शकत नाही. २० मे रोजी प्रदर्शित होणारा ...
तरुणाईचा सळसळता उत्साह, जोश आणि बदल घडवण्याची मजबूत इच्छा याला कोणी रोकू शकत नाही. २० मे रोजी प्रदर्शित होणारा युथ हा तरुणाईवर आधारित चित्रपट आहे. युथ हा सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे आणि यामध्ये पाणी टंचाईचा विषय हाताळण्यात आला आहे. विक्टरी फिल्म्स प्रस्तुत, सुंदर सेतुरामन निर्मित आणि राकेश कुडाळकर दिग्दर्शित युथ या चित्रपटाचा संगीत सोहळा नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता जावेद जाफरी उपस्थित होते तसेच दिग्दर्शक राकेश कुडाळकर, संगीत दिग्दर्शक विशाल राणे, जगदीश पवार आणि 'युथ' चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. मिडीयाचा प्रतिसाद देखील सकारात्मक होता. युथ या नावाप्रमाणे या चित्रपटातील गाणी नक्कीच युथला आवडतील.विशाल चव्हाण आणि युग यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा लिहिली असून राकेश कुडाळकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातील संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी विशाल राणे आणि जगदीश पवार यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात नेहा महाजन, सतिश पुळेकर, विक्रम गोखले, अक्षय वाघमारे, अक्षय म्हात्रे, मीरा जोशी, शशांक जाधव, केतकी नारायण कलाकारांची प्रमुख भूमिका आहे आणि अतिथी पाहुणे म्हणून सयाजी शिंदे यांचाही सहभाग या चित्रपटात आहे.