Join us

झी चित्र गौरव पुरस्कार: 'माझ्या पंखांना बळ देणाऱ्या..'; प्रिया बापटची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 16:05 IST

Priya bapat: करिअरमध्ये तिची साथ देणाऱ्या प्रत्येकाचे प्रियाने आभार मानले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (priya bapat). उत्तम अभिनयशैली आणि मस्तीखोर स्वभाव यांच्या जोरावर प्रियाने अफाट लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळेच ती कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. प्रियाने आजवरच्या कारकिर्दीत नाटक, मालिका, सिनेमा आणि वेबसीरिज अशा प्रत्येक माध्यामातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिच्या याच कार्याची दखल झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात घेण्यात आली.

नुकत्याच झालेल्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात प्रियाला पुरस्कार देत सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार घेताना प्रिया भावुक झाली असून तिने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच तिच्या या प्रवासात तिला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे तिने आभार मानले आहेत.

काय आहे प्रियाची पोस्ट?

“मराठी पाउल पडते पुढे” आपल्या यशाचं कौतुक होत, पण तिथपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाला शाबासकी मिळणं हे जास्त Special आहे. आपल्या कष्टांची, मेहनतीची दखल घेउन त्यातून मिळवलेल्या यशाबद्दल उभ्या महाराष्ट्राला अभिमान वाटणं हे खूप मानाचं आहे. आज हा पुरस्कार स्विकारतांना मन भरून आलं. माझा अभिनेत्री म्हणून आजपर्यंतच्या प्रवासातले सगळे दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार, विद्या ताई सर्वांना खूप खूप धन्यवाद.झी मराठी या मानासाठी मनःपूर्वक धन्यवाद. मोठी झेप घेउ पाहणाऱ्या माझ्या पंखांना बळ देणाऱ्या आई- वडिलांना नमस्कार. माझ्या अभिनय क्षमतेवर विश्वास दाखवून मला नवं आकाश खुलं करून देणाऱ्या नागेश कुकनूर यांना मनःपूर्वक धन्यवाद. श्वेता तुला खूप खूप प्रेम. मुकुंद मेन्शन माझं कुटुंब आहे आणि राहील.आणि कायम माझ्या सोबत, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून मनापासून प्रेम करणारा उमेश .

दरम्यान,प्रियाने इन्स्टाग्रामवर या पुरस्कार सोहळ्याचे काही फोटो सुद्धा शेअर केले आहेत. त्यामुळे तिच्या या पोस्टवर सध्या सेलिब्रिटी आणि चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामतसेलिब्रिटीसिनेमावेबसीरिज