Join us

केदार शिंदेंचं फेसबुक अकांउट हॅक, म्हणाले- माझा काहीच कंट्रोल नाही....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 12:53 PM

गेल्या काही दिवसांपासून फेसबुक अकाउंट हॅक होण्याचे प्रकार वाढले आहेत. केदार शिंदेंच्या आधीही अनेक कलाकारांसोबत असा प्रकार घडला आहे.

केदार शिंदे (Kedar Shinde) या नावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीत त्यांचं नाव येतं. केदार शिंदे  सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट क्षणात व्हायरल होतात. सध्या त्यांची अशीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

केदार शिंदेचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे. इन्स्टाग्रामवर त्यांनी स्टोरी शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.  केदार शिंदे यांनी पोस्ट शेअल लिहिलं, 'नमस्कार, काल रात्री माझं फेसबुक अकांऊंट हॅक झालं आहे. यामध्ये पर्सनल आणि पेज दोन्हीही हॅक झालंय. त्यामुळे त्या अकाउंटवर माझा काहीच कंट्रोल नाही. त्यामुळे या दोन्ही अकाउंटद्वारे तुमच्याशी कोणताही संपर्क किंवा संवाद साधला जात असेल तर सावधान. कुठल्याही प्रकारचे रिप्लाय अथवा मेसेज करु नका'.

गेल्या काही दिवसांपासून फेसबुक अकाउंट हॅक होण्याचे प्रकार वाढले आहेत. केदार शिंदेंच्या आधीही अनेक कलाकारांसोबत असा प्रकार घडला आहे. अनेक कलाकारंचेही फेसबुक अकाउंट हॉक झाले आहेत. त्यांनीही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सतर्कता बाळगण्यास सांगितली आहे.

केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखलं जाणारं नाव आहे. केदार शिंदे हे एक दिग्दर्शक, लेखक, अभिनेते आणि लोककला सादरकर्ते आहेत. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि सिनेमा क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केले. प्रत्येक कलाकृतीमधून मध्यमवर्गीय, सामान्य माणसाला रिलेट होतील असे विषय केदार शिंदे यांच्याकडून सहज हाताळले जातात.  ‘अगं बाई अरेच्चा’ या गाजलेल्या चित्रपटापासून ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेपर्यंत अनेक दर्जेदार कलाकृतींची निर्मिती त्यांनी केली आहे.

 

टॅग्स :केदार शिंदे