Join us

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी खरेदी केली इको फ्रेंडली कार, किंमत वाचून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 20:04 IST

Video : रवी जाधव यांनी खरेदी केली नवी कोरी कार, शेअर केला व्हिडिओ

मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव चर्चेत आहेत. टाइमपास, बालक पालक, नटरंग, बालगंधर्व असे अनेक हिट सिनेमे त्यांनी सिनेसृष्टीला दिले. मराठीबरोबरच रवी जाधव यांनी हिंदी सिनेसृष्टीतही त्यांचा ठसा उमटवला. अलिकडेच प्रदर्शित झालेली त्यांची ताली ही वेब सीरिज लोकप्रिय ठरली. रवी जाधव सध्या चर्चेत आले आहेत ते त्यांच्या नव्या कोऱ्या गाडीमुळे. त्यांनी घटस्थापनेच्या मुहुर्तावर नवी कोरी इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. 

रवी जाधव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्यांच्या नव्या कोऱ्या गाडीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी टोयोटा हायक्रॉस झेड एक्स (Toyota Hycross ZX(O)) ही इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत तब्बल ३० लाखांच्या घरात आहे. रवी जाधव यांनी नव्या गाडीचा व्हिडिओ शेअर करत "इको फ्रेंडली लक्झरी फॅमिली मेंबर" असं म्हटलं आहे. त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

रवी जाधव यांचा 'मे अटल हूं' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्या 'बाल शिवाजी' या चित्रपटाचीही प्रेक्षक वाट पाहत आहेत. या चित्रपटात अभिनेता आकाश ठोसर मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.  

टॅग्स :रवी जाधवमराठी अभिनेता