Join us

रवी जाधव यांनी खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेश करत दाखवली झलक; म्हणाले- "डोंबिवलीच्या गावातील छोट्याशा घरापासून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:18 IST

रवी जाधव यांनी नववर्षाबरोबरच त्यांच्या आयुष्याचीही नव्याने सुरुवात केली आहे. नवं घर त्यांनी खरेदी केलं आहे.

काही सेलिब्रिटींनी २०२५ या नववर्षाच्या सुरुवातीलाच चांगली बातमी दिली आहे. अनेकांनी या नववर्षाची सुरुवात दणक्यात केली. अभिनेत्री रुपाली भोसलेने २०२५च्या सुरुवातीलाच मर्सिडीज बेंझ ही लक्झरी कार खरेदी केली. तर आता प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी नव्या वर्षात त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. 

रवी जाधव यांनी नववर्षाबरोबरच त्यांच्या आयुष्याचीही नव्याने सुरुवात केली आहे. नवं घर त्यांनी खरेदी केलं आहे. या नव्या घराच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी ही बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. रवी जाधव यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओत त्यांच्या आलिशान घराची झलक पाहायला मिळत आहे. "डोंबिवली बाहेरील दावडी गावातील छोट्याशा घरातून सूरू झालेला आमचा दोघांच्या स्वप्नांचा प्रवास आता इथवर येऊन पुन्हा नव्याने नवी स्वप्ने पहायला सज्ज झाला आहे. आमच्या नव्या घराच्या वास्तूशांतीचे हे काही खास क्षण. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या ही विनंती", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, रवी जाधव हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. 'बालक पालक', 'टाइमपास',' नटरंग', 'बालगंधर्व', 'अनन्या' असे सुपरहिट सिनेमे त्यांनी सिनेसृष्टीला दिले आहेत. मराठीबरोबरच त्यांनी 'अटल' या हिंदी सिनेमाचंही दिग्दर्शन केलं आहे. तर ताली या हिंदी वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. 

टॅग्स :रवी जाधवसेलिब्रिटी