मराठीसह हिंदी कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारा लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव (ravi jadhav). 'नटरंग', 'न्यूड', 'टाइमपास', 'बालगंधर्व', 'ताली', 'मैं अटल हूँ' यांसारखे अनेक हिंदी,मराठी सिनेमा, वेबसीरिजचं दिग्दर्शन करुन त्याने इंडस्ट्रीवर त्याची छाप पाडली आहे. त्यामुळे रवी जाधव याच्या फिल्मी करिअरविषयी जवळपास साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारस कोणाला माहित नाही. परंतु, यावेळी त्याने त्याच्या गावाची आणि खासकरुन गावच्या घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
रवी जाधव सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा तो त्याच्या जीवनातील लहान मोठे किस्से, घटना वा प्रसंग चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यावेळी माघी गणेशत्सोवानिमित्त तो गावी गेला होता. मात्र, गावच्या मातीत गेल्यानंतर पुन्हा मुंबईत येण्यासाठी त्याचा पाय काही घरातून निघत नव्हता. याविषयी त्याने पोस्ट शेअर करत त्याच्या गावची झलक दाखवली आहे.
अलिकडेच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या गावची झलक दाखवली आहे. विशेष म्हणजे त्याचं गाव निसर्गाच्या सान्निधन्यात असून अत्यंत टुमदार आणि सुरेख असं त्याचं घर आहे.
'गा
रवी जाधव मूळचा कोकणातील संगमेश्वर येथील आहे. संगमेश्वरमधील कासे हे त्याचं गाव असून हे गाव चहूबाजूने हिरव्या दाट झाडांनी वेढलेलं आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरेख कौलारु घर, दारापुढे तुळशी वृंदावन, घराभोवती घनदाट हिरवी झाली. घराच्या जवळ मस्त संथ वाहणारी नदी असं सुरेख वातावरण असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्याच्या घराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.