कोल्हापूर : ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांनी 13 हून अधिक मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन केले होते. नाथा पुरे आता, राजमाता जिजाऊ, लेक लाडकी, हाय कमांड हे त्यांचे गाजलेले चित्रपट होत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष होते.जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओ वाचवण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. नुकताच शालिनी स्टुडिओच्या जागेवर बांधकाम करण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती, त्याचा आनंद दोन दिवसांपूर्वीच त्यांनी साजरा केला होता. रंकाळा तलाव वाचवण्यासाठीही त्यांचे मोलाचे योगदान होते. रोज सकाळी रंकाळा तलावावर ते नियमित फिरायला येत असत.अलिकडील पाच, सहा वर्षे ते रंकाळा बचाव आंदोलनाचे आघाडीचे कार्यकर्ते बनले होते. प्रकृती ही उत्तम होती. लोकमत संपादक सल्लागार मंडळाचे ते सदस्य होते. कालच सायंकाळी त्यांनी या बैठकीला येतो असे सांगितले होते आणि बुधवारची सकाळ ही त्यांच्या निधनाच्या दुःखद बातमीनं उजाडली आहे.
ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 7:43 AM
ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
ठळक मुद्देज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन 13 हून अधिक मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन केले होते. नाथा पुरे आता, राजमाता जिजाऊ, लेक लाडकी, हाय कमांड हे त्यांचे गाजलेले चित्रपट होत.