Join us

ऑनस्क्रीन नव्हे ऑफस्क्रीनही संजूला मिळते रणजीतची साथ; दोन दिवसात शिकवली बुलेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 16:20 IST

Raja rani chi g jodi: एखाद्या प्रशिक्षित बाइकर्सप्रमाणे बुलेट चालणारी संजू अवघ्या दोन दिवसांमध्ये गाडी चालवायल्या शिकल्याचं सांगण्यात येतं.

ठळक मुद्देसंजू पोलीस झाल्यापासून ती सातत्याने बाईकवरुन फिरताना दिसते.

अल्पावधीत तुफान लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे राजा रानीची गं जोडी. अभिनेत्री शिवानी सोनार आणि मनिराज पवार यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांचं मन जिंकण्यास यशस्वी ठरत आहे. अलिकडेच या मालिकेतील साहसदृश्यांसाठी संजूने म्हणजेच शिवानी सोनारने विशेष मेहनत घेतल्याचं समोर आलं आहे. अवघ्या दोन दिवसामध्ये तिने बाईक चालवायला शिकल्याचं सांगण्यात येतं.

संजू पोलीस झाल्यापासून ती सातत्याने बाईकवरुन फिरताना दिसते. एखाद्या प्रशिक्षित बाइकर्सप्रमाणे बुलेट चालणारी संजू अवघ्या दोन दिवसांमध्ये गाडी चालवायल्या शिकल्याचं सांगण्यात येतं. याविषयीचा अनुभवदेखील तिने शेअर केला आहे.

“सध्यस्थिती पाहता आम्ही सगळेच जण सेटवर काळजीपूर्वक वावरत आहोत. त्यामुळे मला बाईक सुद्धा हॉटेलच्याच आवारात शिकावी लागली. मनिराजने म्हणजेच रणजीतने मला बुलेट चालवायला शिकवलं. मनिराजकडे स्वत:ची बुलेट असल्यामुळे मला गाडी शिकणं आणि शिकवणं थोडं सोपं गेलं. अवघ्या एक-दोन दिवसात मी बुलेट चालवायला शिकले, असं संजू म्हणाली.

दरम्यान,  मालिका सुरू झाली तेव्हा संजूचा TOKKKK संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झाला. अजूनही तिने तोंडातून काढलेला TOKKKK हा आवाज लोकप्रिय आहे. त्यातच संजू PSI झाल्यानंतर तिच्यात झालेला अमुलाग्र बदल सुद्धा प्रेक्षकांना विशेष भावतोय. 

टॅग्स :टेलिव्हिजनराजा रानीची गं जोडीसेलिब्रिटी