इनामदारांच्या घरात साजरी होणार दीपाची दिवाळी; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 05:30 PM2021-11-05T17:30:00+5:302021-11-05T17:30:00+5:30

Rang majha vegla: दीपा आणि कार्तिक हे दोघंही विभक्त होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र, त्यांच्या मनात एकमेकांविषयी असलेलं प्रेम यत्किंचितही कमी झालेलं नाही.

marathi serial rang majha vegla deepa share video from inamdar house | इनामदारांच्या घरात साजरी होणार दीपाची दिवाळी; पाहा Video

इनामदारांच्या घरात साजरी होणार दीपाची दिवाळी; पाहा Video

googlenewsNext

गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका म्हणजे रंग माझा वेगळा (Rang Majha Vegla). उत्तम कथानक आणि त्याला साजेसा कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसत आहे. दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर ही मालिका अधिकाधिक रंजक वळणावर पोहोचली. हे दोघंही विभक्त होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र, त्यांच्या मनात एकमेकांविषयी असलेलं प्रेम यत्किंचितही कमी झालेलं नाही. विशेष म्हणजे बरीच वर्ष विभक्त राहिल्यानंतर आता दीपाचा पुन्हा एकदा इनामदारांच्या घरात जाणार असल्याचं दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर तसा व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे.

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर दीपाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने ओम शांती ओम चित्रपटातील एका गाण्यावर इन्स्टा रिल केलं आहे. विशेष म्हणजे हा रिल तिने इनामदारांच्या घरात केल्यामुळे दीपा लवकरच तिच्या सासरी परतणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. व्हायरल होत असलेला दीपाचा हा व्हिडीओ केवळ सहज म्हणून काढण्यात आला. 

दरम्यान, अलिकडेच स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला होता. या प्रोमोमध्ये दीपा दिवाळीच्या मुहुर्तावर इनामदारांच्या बंगल्याबाहेर उभी असल्याचं दिसून येतं. इतकंच नाही. तर, त्याच वेळी सौंदर्या इनामदार तिला पाहतात. सौंदर्या आणि दीपा या दोघी आमनेसामने येतात. त्यामुळे दीपाचा लवकरच इनामदारांच्या घरात गृहप्रवेश होण्याची शक्यता असल्याचं दिसून येत आहे.
 

Web Title: marathi serial rang majha vegla deepa share video from inamdar house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.