मालिकांच्या टीआरपीवरून ( TRP ratings) मालिकेची लोकप्रियता ठरते. साहजिकच टीआरपीच्या शर्यतीत सतत अव्वल राहण्यासाठी मालिकांमध्ये नवनवे ट्वीस्ट येत राहतात. काही अनपेक्षित वळणं प्रेक्षकांना आवडतात तर काहींना प्रेक्षक लगेच कंटाळतात. तूर्तास चर्चा आहे ती या आठवड्यातील टीआरपी यादीतील टॉप 10 मालिकांची. तर या आठवड्यात सातत्याने टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल असणारी ‘आई कुठे काय करते’ नंबर 1 वरून नंबर 2वर फेकली गेलीये.
गेल्या काही आठवड्यांपासून ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte Serial) मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल होती, मात्र आता ‘आई कुठे काय करते’ मागे टाकत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
दुस-या क्रमांकावर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आहे. स्टार प्रवाहवरचीच ‘मुलगी झाली हो’ ही मालिका टीआरपी यादीत तिस-या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका आहे. तर पाचव्या क्रमांक ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेनं पटकावला आहे.
ठिपक्यांची रांगोळी (महाएपिसोडे), माझी तुझी रेशीमगाठ, ठिपक्यांची रांगोळी या अनुक्रमे सहाव्या, सातव्या व आठव्या क्रमांकावर आहेत. बिग बॉस मराठी 3 हा शो टीआरपी यादीत नवव्या क्रमांकावर आहे. तर येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका दहाव्या स्थानी आहे.
सध्या अनेक मालिकांमध्ये वेगवेगळी वळणं पाहायला मिळत आहेत. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अलीकडे अभिनेता ओंकार गोवर्धन याची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. ओंकार या मालिकेत अरुंधतीचा मित्र आशुतोष केळकर म्हणून दिसतो आहे. अरुंधतीच्या महाविद्यालयीन जीवनातील हा मित्र पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात आला आहे. त्याने अरूंधतीला म्युझिक अल्बममध्ये गाण्याची ऑफर दिली असून अरूंधतीने ती स्वीकारली आहे.