Join us

स्टार प्रवाहवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद; 'लक्ष्मीच्या पावलांनी' ईशा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 11:56 AM

स्टार प्रवाहवरील एक मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्या जागी 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मालिका आणि प्रेक्षक यांचं एक वेगळं नातं असतं. जर प्रेक्षकांनी एखादी मालिका डोक्यावर घेतली तर ती मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचते. पण मालिकेतील ट्विस्ट रटाळ वाटू लागले की प्रेक्षक त्या मालिकेकडे पाठ फिरवतात. याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर होतो. मग मालिका बंद करावी लागते. 

गेल्या काही दिवसांत 'सहकुटुंब सहपरिवार', 'रंग माझा वेगळा', 'स्वाभिमान' या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला असून नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. या पाठोपाठ आणखी एक मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्या जागी 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर स्टार प्रवाहवरील 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

ईशा केसकर आणि अक्षर कोठारीची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका २० नोव्हेंबरपासून रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर सध्या रात्री ९.३० वाजता 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सुरू आहे. त्यामुळे 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका बंद होणार असा अंदाज चाहते लावत होते. मात्र, तसे नसून 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे.  

तर रात्री १० वाजता प्रसारित होणारी 'ठिपक्यांची रांगोळी' बंद झाल्यानंतर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका तिच्याजागी प्रसारित होईल. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेची रात्री ९.३० ची जागा ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका घेईल.  त्यामुळे सध्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ही मालिका सुद्धा बंगाली आणि हिंदी भाषेतील एका मालिकेचा रिमेक असल्याचं म्हटलं आहे.

टॅग्स :स्टार प्रवाहसेलिब्रिटी