Join us

मिलिंद गुणाजीच्या हँडसम मुलाला पाहिलं का? दिग्दर्शक म्हणून कलासृष्टीत आजमावतोय नशीब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 8:00 AM

Milind Gunaji : अभिषेक हा मिलिंद गुणाजी आणि प्रसिद्ध अभिनेत्री व सुत्रसंचालिका राणी गुणाजी यांचा एकुलता एक मुलगा.

ठळक मुद्दे गेल्या वर्षी त्याने ‘छल’ या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन केले होते. यात सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

मिलिंद गुणाजी (Milind Gunaji) हा एक गुणी अभिनेता. मराठीसोबतच हिंदीतही त्यानं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘भटकंती’ हा शब्द ऐकला तरी मिलिंद गुणाजीचा चेहरा डोळ्यांपुढे येतो. कारण ‘भटकंती’ हा मिलिंदचा ट्रव्हल शो प्रचंड लोकप्रिय झाला होता.  महाराष्ट्रातील किल्ले, लेण्या आणि पुरातन मंदिरांची सैर त्याने या ट्रव्हल शोच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना  घडविली होती.  पण आज आम्ही मिलिंदबद्दल नाही तर त्याच्या एकुलत्या एका मुलाबद्दल सांगणार आहोत.

अभिषेक (Abhishek Gunaji ) हा मिलिंद गुणाजी आणि प्रसिद्ध अभिनेत्री व सुत्रसंचालिका राणी गुणाजी यांचा एकुलता एक मुलगा. अभिषेकने मुंबईतील रामनारायण रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याच्याशी त्याची खूप जवळची मैत्री आहे. अनेकदा हे दोघेही मित्र एकत्रित पाहायला मिळतात. हाच अभिषेक आता मनोरंजनसृष्टीत दाखल झाला आहे. आईबाबांच्या पावलावर पाऊल ठेवत, अभिषेक अभिनय क्षेत्रात येईल, अशी अपेक्षा होती. पण अभिषेकने स्वत:साठी दिग्दर्शन क्षेत्र निवडलं.

अभिषेकला फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे मात्र आता तो दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावत आहे.   गेल्या वर्षी त्याने ‘छल’ या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन केले होते. यात सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय ‘आपलं कर्जत जामखेड’ या भटकंती सिरीजचे दिग्दर्शनही त्याने केले.

नुकतीच टीव्हीसी पाईपच्या जाहिरातीसाठी दिग्दर्शनाची भूमिका त्याने पार पाडली आहे, सुपर टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत काम करण्याची संधी यानिमित्तानं त्याला मिळाली. सोनाली कुलकर्णीसारख्या दिग्गज अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य असल्याचं त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.प्रसिद्ध अभिनेत्री आणि सुत्रसंचालिका राणी गुणाजी या मिलिंद गुणाजी यांच्या पत्नी आहेत. ‘कल्पांतर’ या मराठी मालिकेत एकत्रित काम करत असताना मिलिंद आणि राणी गुणाजी यांची भेट झाली होती. या भेटीचे प्रेमात आणि नंतर लग्नात रूपांतर झाले. मिलिंद गुणाजी त्यावेळी मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होते. कल्पांतर ही त्यांनी अभिनित केलेली पहिलीच मालिका तर त्यावेळी राणी गुणाजी नाटकांमधून सक्रिय होत्या. त्यांनी ह म बने तू म बने या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती. शिवाय कुकरी शोच्या होस्ट म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. 

टॅग्स :मिलिंद गुणाजी