Madhura Joshi : 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून अभिनेत्री मधुरा जोशी( Madhura Joshi) प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने इमली नावाची व्यक्तिरेखा साकारून चांगलीच लोकप्रियता मिळवली. मधुरा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. त्यामाध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अभिनयाव्यतिरिक्त मधुराचा कपड्यांचा व्यवसाय आहे. दरम्यान, नुकतीच सोशल मीडियावर अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिने खास पोस्ट केली आहे.
२०२० मध्ये मधुरा जोशी अभिनेता गुरू दिवेकरसोबत विवाहबंधनात अडकली. त्याच्या सुखी संसाराला ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच अभिनेत्रीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मधुराने लिहलंय, "करूया आता लग्न असा केला होता विचार . कळलच नाही tom & jerry सारख्या ह्या संसाराला कधी चार वर्ष झाली". असं मजेशीर कॅप्शन देत तिने इन्स्टाग्रामवर लग्नाचे सुंदर असे फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्रीच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. मधुराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर मराठी कलाकारही व्यक्त होताना दिसत आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, कोमल कुंभार तसेच शर्वरी जोग या कलाकार मंडळींसह चाहत्यांनी कमेंट करत दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळतंय. गुरू दिवेकर आणि मधुरा दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दोघांचे एकत्र फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात