Join us

VIDEO: 'तुझ्यात जीव रंगला' फेम धनश्री काडगावकर पोहोचली सप्तशृंगी गडावर, घेतलं देवीचं दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:53 IST

कलाकार मंडळी हे कायम त्यांच्या कामामुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.

Dhanashri Kadgaonkar: कलाकार मंडळी हे कायम त्यांच्या कामामुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात ते आपले अपकमिंग प्रोजक्ट्स तसेच अनेक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. अशातच तुझ्यात जीव रंगला फेम धनश्री काडगावकरनेसोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ लक्षवेधी ठरला आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्यातील कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. राणादा आणि पाठकबाईंप्रमाणे त्यातील वहिनीसाहेबांचं पात्र साकारणारी धनश्री आजही प्रेक्षकांना आठवते.

धनश्री काडगावर सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. त्यावर वेगवेगळे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच नुकतीच नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला पोहोचली आहे. याची झलक खास व्हिडीओद्वारे तिने चाहत्यांना दाखविली आहे. नुकतंच अभिनेत्रीने सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं आहे. देवदर्शनाचे व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. "साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ सप्तशृंगी माता मंदिर..." असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, धनश्री काडगावकरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने आपली प्रतिक्रिया देत म्हटलंय, "उदे गं अंबे उदे...," तर आणखी एका यूजरने "मस्त..." अशी कमेंट करत धनश्रीचं कौतुक केलं आहे. 

टॅग्स :धनश्री काडगावकरटेलिव्हिजनसेलिब्रिटीसप्तश्रृंगी देवी मंदिरसोशल मीडिया