Join us  

‘मराठी टायगर्स’ची बेळगावमध्ये एंट्री

By admin | Published: January 22, 2016 2:12 AM

कर्नाटकातील बेळगाव आणि महाराष्ट्रातील सीमारेषेवरून इतके वर्ष सुरू असलेला वाद नवीन नाही. त्यात भरीस भर म्हणजे या वादावर भाष्य करणारा

कर्नाटकातील बेळगाव आणि महाराष्ट्रातील सीमारेषेवरून इतके वर्ष सुरू असलेला वाद नवीन नाही. त्यात भरीस भर म्हणजे या वादावर भाष्य करणारा ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट बेळगावमध्ये प्रदर्शित होण्यावर बंदी घालण्यात आली असल्याने हा वाद आता अजूनच शिगेला पोहोचला आहे. पण आता हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने त्याचे प्रमोशन होणेही तितकेच गरजेचे आहे. या प्रमोशनसाठी चित्रपटाची संपूर्ण टीम बेळगावमध्ये दाखल होणार होती. पण हा वाद इतका टोकाला पोहोचलेला असताना बेळगावमध्ये एंट्री करायची कशी, हा प्रश्न संपूर्ण टीमला पडणे साहजिक होते. या वेळी या चित्रपटाच्या टीमने माघार न घेता युद्धाची शिकवण दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचीच युद्धनीती वापरायची ठरवली आणि प्रमोशनचा दौरा रद्द झाल्याचे बेळगाव पोलिसांना गुंगारा देऊन गनिमी काव्याचा वापर करीत दुसऱ्याच मार्गाने या टीमने बेळगावमध्ये शिरकाव केला. टीमने एकत्र येऊन वापरलेल्या या वादाबद्दल अभिनेता अमोल कोल्हे सांगतो, ‘‘हा अतिशय दुर्दैवी वाद आहे, कारण सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला संमती दिली आहे. इतकेच नाही तर त्या वेळी कानडी भाषिक सेन्सॉर बोर्डाचे एक मेंबरही तिथे उपस्थित होते. असं असूनही कानडी शासनाने विनाकारण गळचेपी केली आहे... आणि ज्या वादाच्या विषयावर चित्रपट आहे तेच कन्नड शासन त्यांच्या कृतीतून प्रत्यक्षात दाखवून देत आहे. यातून त्यांचाच चेहरा उघडा पडत आहे.’’