Join us

पुन्हा जमली मित्रांची मैफील; बऱ्याच दिवसांनी एकत्र आले 'दिल दोस्ती दुनियादारी'चे कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 15:48 IST

Dil dosti duniyadari: ही मालिका पुन्हा सुरु होणार का? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'दिल दोस्ती दुनियादारी' (dil dosti duniyadari). मैत्रीवर आधारित असलेली ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतून अनेक नवोदित कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले. विशेष म्हणजे या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळे ही मालिका बरीच गाजली. ही मालिका संपून आता काही वर्ष झाले आहेत. मात्र, त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. त्यामुळे ही मालिका पुन्हा सुरु करा, अशी मागणी वरचेवर प्रेक्षक करत असतात. यामध्येच या मालिकेतील कलाकारांनी त्यांचं एक छानसं गेट टूगेदर केलं आहे.

अभिनेत्री सखी गोखले हिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिल दोस्ती दुनियादारीची पूर्ण टीम एकत्र आल्याचं दिसून येत आहे. तिने हा फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडत ही मालिका पुन्हा सुरु करा अशी जोरदार मागणी केली आहे.

दरम्यान, सखीसह या मालिकेतील कलाकारांनी नुकतीच चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या  कार्यक्रमाच्या सेटवरचे काही फोटो सखीने शेअर केले आहेत. सोबतच “ इस घर के सभीं पात्र काल्पनिक है ! “, असं मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. चला हवा येऊ द्याच्या मंचावर  या सगळ्याच कलाकारांनी तुफान मज्जा केली असून त्यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसखी गोखलेसुव्रत जोशीस्वानंदी टिकेकरअमेय वाघ