Join us

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; बाळाचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 11:54 IST

Sayali parab: 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेतील अभिनेत्री सायली परब नुकतीच आई झाली आहे.

गेल्या काही काळामध्ये मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी पालकत्व स्वीकारलं आहे. धनश्री काडगांवकरपासून मिनाक्षी राठोडपर्यंत अनेक दिग्गज अभिनेत्रींनी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. यामध्येच आता सुखाच्या सरींनी हे मन बावरेफेम अभिनेत्रीदेखील नुकतीच आई झाली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने ही गोड बातमी चाहत्यांसह शेअर केली.

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेतील अभिनेत्री सायली परब (sayali parab) नुकतीच आई झाली आहे. गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.  इन्स्टाग्रामवर बाळाच्या चिमुकल्या हातांचा फोटो शेअर करत तिने ही गुड न्यूज शेअर केली.

'१९ ऑगस्ट २०२२ रोजी गोपाळकालाच्या दिवशी आमच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं', असं सांगत सायलीने तिला मुलगा झाल्याचं सांगितलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सायलीने इन्स्टावर तिच्या डोहाळजेवणाचे फोटो शेअर केले होते. सायली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सायलीने इंद्रनील परबसोबत लग्न केलं आहे.सायलीने 'तू सौभाग्यवती हो, 'हे मन बावरे' या मालिकांसह , 'हुतात्मा' या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनधनश्री काडगावकर