Join us  

मराठमोळी मस्तानी मानसीचा मुजरा

By admin | Published: July 17, 2016 5:27 AM

गा यिका श्रीपर्णा चटर्जी हिने गायलेले ' हाय-रब्बा हुस्न ये है, जलवा है ये, सारी रात का मकसद क्या है ....’ या गाण्यावर अभिनेत्री मानसी नाईक खास तिच्या अदामध्ये ‘वज्र’ या चित्रपटात मुजरा

गा यिका श्रीपर्णा चटर्जी हिने गायलेले ' हाय-रब्बा हुस्न ये है, जलवा है ये, सारी रात का मकसद क्या है ....’ या गाण्यावर अभिनेत्री मानसी नाईक खास तिच्या अदामध्ये ‘वज्र’ या चित्रपटात मुजरा करताना दिसणार आहे. मयूर करंबळीकर दिग्दर्शित या चित्रपटात ती खास मस्तानी स्टाईलने मुजरा करताना प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार आहे. या चित्रपटाचे निर्माते शंतनु देशपांडे असून, संगीतकार व गीतकार म्हणून चंद्रमोहन यांनी या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली आहे, तर मानसीसोबत अभिनेता राहुल सोलापूरकरचा अभिनयदेखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, तसेच या मुजराविषयी ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना मानसी म्हणाली, ‘या नृत्यासाठी नृत्यदिग्दर्शक बॉबी सय्यद आणि कॅमेरामन यांनी खूप मेहनत घेतली आहे. माझे 'मुजरा नृत्य' म्हणजे मुजऱ्याच्या रूपात लावणी असून, मराठी चित्रपटात हा प्रकार प्रथमच पाहायला मिळणार आहे. माझे गाणे म्हणजे 'मराठमोळी मस्तानी' दाखविण्याचा हा एक नवीन प्रयोग असून, एक मराठमोळी मस्तानी तुमच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे असे समजा.’