Join us

मराठवाडा-विदर्भातल्या निर्मात्यांची ‘हृदयात समथिंग समथिंग’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 10:52 AM

रॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे निर्मित ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट येत्या 5 ऑक्टोबरला रिलीज होत आहे.

ठळक मुद्दे ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट येत्या 5 ऑक्टोबरला रिलीज होत आहे ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट निखळ मनोरंजन करणारा धमाल विनोदी सिनेमा आहे.

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे निर्मित ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट येत्या 5 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, प्रियंका यादव, भुषण कडू आणि अभिनयसम्राट अशोक सराफ स्टारर ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट निखळ मनोरंजन करणारा धमाल विनोदी सिनेमा आहे.

‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमासाठी यवतमाळचे विनोदकुमार जैन, अकोल्याचे शैलेंद्र पारख, नांदेडचे स्वप्निल चव्हाण आणि औरंगाबादचे अतुल गुगळे असे चार दिग्गज एकत्र आले आहेत. भारत सरकारकडून सलग पाचवेळा गौरान्वित झालेले विदर्भातले रासायनिक खतांचे बडे उद्योजक विनोदकुमार जैन ह्यांनी आपल्या तीन मित्रांसह पिरॅमीड फिल्म्स हाऊसची मुहूर्तमेढ रोवली.

विनोदकुमार जैन सांगतात,”मी उद्योगपती असलो तरीही लहानपणापासून सिनेमाचा चाहता आहे. आपण महाराष्ट्राचे मनोरंजन करणारा एक विनोदी सिनेमा बनावावा, असा विचार गेली कित्येक वर्ष मनात होता. ही इच्छा मी शैलेंद्र पारख ह्यांच्याकडे बोलून दाखवली, त्यांना ती आवडली. आणि मग आमचे मराठवाड्यातले दोन मित्र स्वप्नील चव्हाण आणि अतुल गुगळेही तयार झाले.”

ते पूढे सांगतात, “मी यवतमाळच्या उमरखेडचा. माझ्या गावी अशोकमामांचे सिनेमे पाहतच मोठा झालो. आणि मग विनोदी सिनेमा करताना मुख्य भूमिकेसाठी अशोकमामांचेच नाव माझ्या डोळ्यांसमोर आले. त्यांनाही सिनेमाचे कथानक आवडले. सिनेमासृष्टीत नव्या असलेल्या आमच्यासोबत अशोकमामांनी सिनेमा करायला होकार दिला, हा त्यांचा मोठेपणा आहे.”

उद्योजक शैलेंद्र पारख ह्यांचा अकोल्यात इलेक्ट्रिक वितरणाचा व्यवसाय आहे. आणि अकोल्यात विद्यार्थिनींसाठीची तीन विद्याविहार गर्ल्स हॉस्टेल आहेत. विद्यविहार गर्ल्स हॉस्टेल विदर्भातले एकुलते एक आयएसओ सर्टिफिकेट मिळालेले हॉस्टेल आहे. तर अतुल गुगळे ह्यांची हॉलीडे प्लस टूर्स ही पर्यटनाची मोठी संस्था आहे. नांदेड जिल्हापरिषदेचे अध्यक्ष असलेले स्वप्नील चव्हाण ह्यांचा सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग असतो.

विनोदकुमार जैन सांगतात, “हृदयात समथिंग समथिंग सिनेमाने चित्रपट निर्मितीची सुरूवात झाली आहे. आता दरवर्षी असेच उत्तमोत्तम आणि मनोरंजक हिंदी आणि मराठी सिनेमे बनवण्याचा आमचा मानस आहे.” पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तूत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला, सचिन संत ह्यांची सहनिर्मिती असलेला  प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्या अभिनयाने सजलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट 5 ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे.

टॅग्स :अशोक सराफअनिकेत विश्वासराव