Join us

लग्नाआधी अभिनेता अनिकेत विश्वासराव या अभिनेत्रीसोबत होता रिलेशनशीपमध्ये, मग केलं अरेंज मॅरेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 16:32 IST

अभिनेता अनिकेत विश्वासरावच्याविरुद्ध त्याची पत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाणने मानसिक आणि शारीरीक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे.

अभिनेता अनिकेत विश्वासरावच्याविरुद्ध त्याची पत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाणने मानसिक आणि शारीरीक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ४९८अ, ३२३, ५०४, ५०६ कलमाखाली अनिकेत सोबत त्याच्या आईवडिलावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मुंबईतील दहिसर येथील विश्वासराव रेसिडेन्सी येथे १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अनिकेत विश्वासरावच्या पत्नीचे नाव स्नेहा चव्हाण असून तीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने काही मालिका व चित्रपटात काम केलं आहे. लग्नाआधी बरेच वर्ष अनिकेत अभिनेत्री पल्लवी सुभाषसोबत रिलेशनशीपमध्ये होता. 

पल्लवी सुभाष आणि अनिकेत विश्वासरावचे अफेअर एकेकाळी खूप गाजले होते. बरेच वर्ष ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यानंतर ते वेगळे झाले. पल्लवी व अनिकेत दोघे जवळजवळ आठ वर्षं रिलेशनशीपमध्ये होते. परंतु काही वर्षांपूर्वी त्यांनी ब्रेकअप केले. याविषयी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना पल्लवीने सांगितले होते की, आम्ही दोघे वेगळे झालो आहोत हे खरे आहे. आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला. ही आमची खाजगी बाब असल्याने आमच्या ब्रेकअपचे कारण काय आहे हे मी सांगू इच्छित नाही. त्यानंतर अनिकेत विश्वासरावने अभिनेत्री स्नेहा चव्हाणसोबत अरेंज मॅरेज केले. मात्र पल्लवी आजही सिंगल आहे.

मानसिक व शारीरीक छळाचा गुन्हा केला दाखल दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून स्रेहा व अनिकेत यांच्यात वाद होत होता. त्यातून फेब्रुवारी २०२१मध्ये स्नेहा माहेरी पुण्यात परत आली. त्यानंतर आता तिने अलंकार पोलीस ठाण्यात मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :अनिकेत विश्वासरावपल्लवी सुभाषस्नेहा चव्हाण