सिनेमात प्रत्येक सीन जास्तीत जास्त रिअल बनवण्याचा प्रयत्न केला जातो. जेणेकरून प्रेक्षकांना त्या भावनेची जाणीव करून द्यावी. पण अनेकदा या नादात अनेक दुर्घटनाही घडतात. काही दिवसांपूर्वीच एक हॉलिवूड सिनेमाच्या सेटवर चुकून सिनेमटोग्राफरला खरी बंदुकीची गोळी लागली आणि तिचा सेटवरच मृत्यू झाला. अशाच काही अभिनेत्यांच्या चुकांमुळे किंवा मेकर्सच्या चुकांमुळे शूटींगच्या सेटवर अनेक दुर्घटना घडतात. अशाच एका जुन्या दुर्घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
जिवंत जळाली गेली होती मार्था मॅन्सफील्ड
आज आम्ही तुम्हाला सिनेमाच्या सेटवरील एका अशाच भयावह दुर्घटनेबाबत सांगणार आहोत. ज्यात तत्कालीन टॉपच्या अभिनेत्री मृत्यू सेटवरच्या नाही तर तिसऱ्याच व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे झाला होता. आम्ही सांगतोय दिवंगत हॉलिवूड अभिनेत्री मार्था मॅन्सफील्ड (Martha Mansfield)बाबत. सिनेमाच्या शूटींग दरम्यान मार्थासोबत भयावह दुर्घटना झाली होती. ज्यानंतर अनेक प्रयत्न करूनही तिचा जीव वाचवता आला नाही.
काडीपेटीच्या काडीने गेला जीव
मार्था त्यावेळी सुपरस्टार होती. त्यावेळी ती मूकपटाचा जमाना होता. 'The Warrens of Virginia' सिनेमाचं शूटींग करतेवेळी मार्थाने तिचा सिव्हिल वॉस सूट घातला होता. हा ड्रेस लगेच आग पकडतो. सीन संपल्यावर ती त्याच ड्रेसवर आपल्या कारमध्ये आराम करण्यासाठी गेली. त्याचवेळी तेथून जात असलेल्या एका व्यक्तीने काडीपेटीतील पेटलेली काडी चुकून तिच्याकडे फेकली.
उपचारानंतरही वाचू शकला नाही जीव
काडीपेटीमुळे मार्थाच्या ड्रेसने आग पकडली आणि ती गंभीरपणे भाजली. घटनेनंतर मार्थाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि दोन दिवस तिच्यावर उपचार केले गेले होते. पण मार्था इतकी गंभीर भाजली होती की, तिला वाचवता आलं नाही. दोन दिवसांनंतर मार्थाने अखेरचा श्वास घेतला.