Join us

भारतात होणार ‘अ‍ॅवेंजर्स -एंडगेम’चे दणकेबाज प्रमोशन! मुंबई येणार जो रूस!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 10:25 AM

कॅप्टन मार्वेलला भारतात मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर हा चित्रपट बनवणारी कंपनी ‘मार्वेल स्टुडिओज’ प्रचंड उत्साहित आहे. हेच कारण आहे की, मार्वेल स्टुडिओजचा पुढचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘अ‍ॅवेंजर्स -एंडगेम’चे दिग्दर्शत जो रूस पुढील महिन्यात भारतात येत आहेत. 

ठळक मुद्देगतवर्षी आलेल्या ‘अ‍ॅवेंजर्स’सीरिजच्या ‘अ‍ॅवेंजर्स - इनफिनिटी वॉर’ या चित्रपटाने एकट्या भारतात २०० कोटींवर बिझनेस केला. मार्वेल स्टुडिओजच्या ‘कॅप्टन मार्वेल’ या अलीकडे प्रदर्शित झालेल्या चित्रपटानेही भारतात अपेक्षेपेक्षा अधिक कमाई केली आहे.

कॅप्टन मार्वेलला भारतात मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर हा चित्रपट बनवणारी कंपनी ‘मार्वेल स्टुडिओज’ प्रचंड उत्साहित आहे. मार्वेल स्टुडिओजसाठी भारत एक मोठी बाजारपेठ बनला आहे आणि हेच कारण आहे की, मार्वेल स्टुडिओजचा पुढचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘अ‍ॅवेंजर्स -एंडगेम’चे दिग्दर्शत जो रूस पुढील महिन्यात भारतात येत आहेत. ‘अ‍ॅवेंजर्स -एंडगेम’ हा अ‍ॅवेंजर्स सीरिजचा अखेरचा भाग मानला जात आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आशियातही या चित्रपटाचा प्रमोशनची तयारी सुरु झाली आहे आणि याची सुरुवात भारतापासून होत आहे. जो रूस स्वत: भारतात येत ‘अ‍ॅवेंजर्स -एंडगेम’चे प्रमोशन करणार आहेत.

गत १० वर्षांत भारत मार्वेल कॉमिक्ससाठी मोठी बाजारपेठ ठरला आहे. मार्वेल स्टुडिओजने २००८ मध्ये मार्वेल कॉमिक्सच्या कथांवर आधारित चित्रपट बनवणे सुरु केले. या  सुपरहिरो चित्रपटांनी जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली. भारतातील चाहत्यांनीही हे चित्रपट डोक्यावर घेतले. हेच कारण आहे की, गतवर्षी आलेल्या ‘अ‍ॅवेंजर्स’सीरिजच्या ‘अ‍ॅवेंजर्स - इनफिनिटी वॉर’ या चित्रपटाने एकट्या भारतात २०० कोटींवर बिझनेस केला. मार्वेल स्टुडिओजच्या ‘कॅप्टन मार्वेल’ या अलीकडे प्रदर्शित झालेल्या चित्रपटानेही भारतात अपेक्षेपेक्षा अधिक कमाई केली आहे. येत्या दिवसांत या चित्रपटाच्या कमाईचा आकडा १०० कोटींपार करेल असे मानले जात आहे. मार्वेल स्टुडिओजला त्यामुळेच भारताकडून प्रचंड अपेक्षा आहेत.मार्वेलचा पुढचा चित्रपट ‘अ‍ॅवेंजर्स -एंडगेम’ येत्या २६ एप्रिलला प्रदर्शित होतो आहे. याआधीच्या भागात थानोसने पृथ्वीवरची अर्धी लोकसंख्या आणि सर्व सुपरहिरोंना मारल्याचे दाखवण्यात आले होते. ‘अ‍ॅवेंजर्स -एंडगेम’मध्ये यानंतर काय होते, हे दाखवले जाणार आहेत. साहजिकच प्रेक्षक उत्सूक आहेत.

टॅग्स :अ‍ॅवेंजर्स- एंडगेमहॉलिवूड