‘मसान’ म्हणजे समाज-परंपरा दरम्यानचा संघर्ष
By Admin | Published: July 24, 2015 02:46 AM2015-07-24T02:46:48+5:302015-07-24T02:46:48+5:30
समांतर आणि गंभीर विषयांवरील चित्रपटांची दुनिया वेगळीच आहे. छोट्या बजेटचे चित्रपट जरी ‘बजरंगी भाईजान’सारखे यशस्वी ठरत नसले तरी त्याला
समांतर आणि गंभीर विषयांवरील चित्रपटांची दुनिया वेगळीच आहे. छोट्या बजेटचे चित्रपट जरी ‘बजरंगी भाईजान’सारखे यशस्वी ठरत नसले तरी त्याला ठरावीक प्रेक्षकवर्ग आहे. अशा वर्गवारीत आणखी एक नवा चित्रपट जोडला गेला आहे ‘मसान’, जो आज प्रदर्शित होतो आहे. यात ऋचा चढ्ढा मुख्य भूमिकेत आहे. तिच्याशिवाय विकी कौशल, श्वेता त्रिपाठी आणि संजय मिश्रा चित्रपटात आहेत. दिग्दर्शन आणि कथा नीरज घायेवान यांची आहे. सहनिर्माता नागपूरचे असून राकेश तोतला असे त्यांचे नाव आहे. ऋचा चढ्ढा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वात पुढे आहे. तिच्याशी गप्पा मारताना उत्सुकता आणि उत्साह जाणवला. ऋचा सांगते, अशी भूमिका करण्याची संधी खूप कमी मिळते. मी यात ‘देवी’ नावाच्या युवतीची भूमिका साकारली आहे. प्रेमीसोबत पोलीस देवीला पकडतात. वाराणसीसारख्या शहरात अशा स्थितीत अडकलेल्या मुलीसाठी कुटुंब-परिवाराचा सामना करणे अवघड असते. देवी एका प्रकरणात अडकते. हे प्रकरण मिटविण्यासाठी पोलिसांचा दबाव आणि वडिलांची गरीब परिस्थिती यामुळे अधिक अडचणी निर्माण होतात. ऋचाच्या अनुसार देवी अशा स्थितीतून पुढे जाते, मात्र आपला आत्मविश्वास हरवत नाही. चित्रपटात आणखी एक प्रेमप्रकरण आहे. शाळेत शिकणाऱ्या जोडप्याचे. मुलामुलीच्या जातीचा मोठा मुद्दा बनतो. हे प्रेमप्रकरणही अवघड स्थितीतून पुढे जात असते आणि एका ठिकाणी देवीच्या प्रकरणाशी जोडले जाते. ऋचाच्या अनुसार प्रेमप्रकरणाचे दोन ट्रॅक आहेत, जे समांतररीत्या पुढे जातात आणि पुढे जाऊन एकाच दिशेने सरकतात.