गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या सुमधूर आवाजाने कानसेनांना तृप्त करणारे प्रयोगशील शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या २४ एप्रिल रोजी दादर येथील षण्मुखानंद सभागृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी राहुल देशपांडे यांना मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी कलाविश्वातील वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. यंदा या पुरस्कारासाठी राहुल देशपांडे, आशा पारेख, जॅकी श्रॉफ, डबेवाले यांची नूतन मुंबई चॅरिटी संस्था आणि 'संज्या छाया' या नाटाकाला मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या ३२ वर्षांत आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पुणे स्थित आणि नोंदणीकृत चॅरिटेबल संस्था मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे यावेळी संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींना सन्मानित केले जात आहे. प्रतिष्ठित मंगेशकर कुटुंबाकडून प्रत्येक वर्षी दिले जाणारा हा पुरस्कार या वेळी रविवारी, म्हणजेच २४ एप्रिल रोजी मुंबई येथील षण्मुखानंद हॉल येथे पार पडणार आहे.