'माझी तुझी रेशीमगाठ'ला झाले १ वर्ष पूर्ण, श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 05:27 PM2022-08-26T17:27:56+5:302022-08-26T17:28:48+5:30

Mazi Tuzhi Reshimagath: 'माझी तुझी रेशीमगाठ'ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. पाहता पाहता या मालिकेला एक वर्ष देखील पूर्ण झाले.

'Mazi Tuzhi Reshimagath' completes 1 year, Shreyas Talpade's emotional post in discussion | 'माझी तुझी रेशीमगाठ'ला झाले १ वर्ष पूर्ण, श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट चर्चेत

'माझी तुझी रेशीमगाठ'ला झाले १ वर्ष पूर्ण, श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट चर्चेत

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ'(Mazi Tuzi Reshimgath) ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. पाहता पाहता या मालिकेला एक वर्ष देखील पूर्ण झाले. या एक वर्षाच्या प्रवासात आलेल्या अनुभवांबद्दल अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)ने सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. सहकलाकारांशी आणि प्रेक्षकांशी एक भावनिक नात निर्माण होत असताना श्रेयस खूपच भारावून गेला आहे. आपल्या सहकलाकारांकडून मिळालेले प्रेम, प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद आणि मालिकेमुळे मिळालेले नवीन प्रोजेक्ट या सर्व गोष्टी माझ्यासाठी तेवढ्याच महत्वाच्या आहेत, असे श्रेयस सांगतो.

 श्रेयस म्हणतो की, माझी तुझी रेशीमगाठचे एक वर्ष पूर्ण झाले. माझ्यासाठी सर्व काही बदलून टाकणारा या शोमध्ये मी खूप सारे नवीन मित्र बनवले. अनेक नवीन आठवणी आणि मला ऑफर केलेले काही सर्वोत्तम चित्रपट देखील मिळाले! हि मालिका माझ्यासाठी खरोखरच आशीर्वाद आहे. त्यामुळे ‘धन्यवाद’ ची यादी जरा लांबलचक आहे. अजय मयेकर, एवढा मोठा संघ फक्त तुम्हीच एकत्र ठेवू शकता आणि  प्रत्येकाला न्याय देता. एक उत्तम मार्गदर्शक असल्याबद्दल धन्यवाद.न रागावता मी केलेले बदल समजून घेतल्याबद्दल आणि मालिकेतील काम मजेदार आणि सोपे बनवल्याबद्दल देखील धन्यवाद.


त्याने पुढे म्हटले की, नेहा, प्रार्थना बेहरे तुझ्या बद्दल काय सांगू. मला तुझ्यात एक खरा मित्र सापडला. तू नेहमी म्हणतेस, आपली छान टीम आहे. यशला खूप छान पद्धतीने सादर केल्याबद्दल धन्यवाद. सेटवरील कंटाळवाणे क्षण हलके केल्याबद्दल धन्यवाद. आपण एकत्र एखादा चित्रपट नक्कीच करूया. मायरा, छोट्या परी तुझेही आभार. आमच्या आयुष्यातील सर्वात गोड मिठाई असल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, तुला मोठ्या मोठ्या मिठी पाठवत आहे. 


संकर्षण कऱ्हाडे, काय बोलू मी. मला तुझ्यात एक मित्र आणि एक धाकटा भाऊ सापडला. माझा सर्वोत्कृष्ट सोबती आणि अप्रतिम अभिनेता असल्याबद्दल धन्यवाद. तू असा मित्र आहेस ज्याला प्रत्येकाच्या आयुष्यात हवाहवासा वाटेल. अतुल महाजन, शीतल क्षीरसागर, स्वाती पानसरे, आनंद काळे, स्वाती देवल, केळकर काका, मानसी ताई, राजेश शिर्के, सुनील भोसले तुम्ही सेटवर रोजचा दिवस मजेदार बनवल्याबद्दल तुमचेही धन्यवाद! मी तुम्हा सर्वांवर भरभरून प्रेम करतो, असे श्रेयसने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Web Title: 'Mazi Tuzhi Reshimagath' completes 1 year, Shreyas Talpade's emotional post in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.