छोट्या पडद्यावरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. सध्या या मालिकेत रंजक वळण आलं आहे. आजोबा आजारी असल्यामुळे त्यांना लवकरात लवकर बरं करण्यासाठी घरातील प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. यामध्येच सिम्मीच्या मदतीने नेहाने आजोबांसोबत खोटं बोलते. यश आणि माझं लग्न झालंय असं नेहा आजोबांना खोट सांगते. मात्र, असं खोटं बोलणं यशला आवडलेलं नाही.
सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये यश आणि समीर एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत. यात नेहाचं खोटं बोलणं मला न पटल्याचं यश समीरला सांगतो. त्यावर नेहाने जे केलं ते आजोबांच्या भल्यासाठीच केलं असं समीर त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. परंतु, यशला हे मान्य होत नाही.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नेहा आणि यश यांच्या नात्यात अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. आजोबा आजारी झाल्यापासून यश सतत चिडचिड करत आहे. इतकंच नाही तर नेहाच्या चुकीमुळेच आजोबा आजारी पडल्याचं त्याने म्हटलं होतं. त्यामुळे या दोघांमध्ये सध्या मतभेद सुरु असल्याचं पाहाला मिळत आहे.