मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव (Ruchira Jadhav). 'माझ्या नवऱ्याची बायको' (Mazya Navryachi Bayko) या मालिकेत माया ही भूमिका साकारून रुचिरा घराघरात पोहचली आहे. ही मालिका संपून आता बराच काळ लोटला आहे. मात्र, तिची लोकप्रियता कायम आहे. रुचिराच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. अभिनेत्री रुचिरा जाधवने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ती सुदर्शन गमरे यांच्या ‘हेमोलिम्फ’ (Haemolymph) या चित्रपटात झळकणार आहे.
हेमोलिम्फ ही अब्दुल वाहिद शेख या शिक्षकाची खरी कथा आहे, ज्यांच्यावर ११ जुलै २००६ रोजी मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटानंतर गंभीर कलमे लावण्यात आली होती. या आरोपांनी वाहिदसह त्याचे कुटुंबीयही खवळले होते. वाहिदचा न्यायासाठीचा संघर्ष रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अब्दुल वाहिद शेखची पत्नी साजिदा शेख ची भूमिका अभिनेत्री रुचिराने साकारली आहे. तिच्यासाठी ही भूमिका खूप चॅलेजिंग होती. कारण या चित्रपटात तिचा चेहरा चित्रपटात दाखवला नसल्याने रुचिराला तिच्या भावना तिच्या डोळ्या, देहबोली आणि आवाजातून व्यक्त कराव्या लागल्या.