Join us

मीना कुमारीच्या बायोपिकमधून मनीष मल्होत्रा करणार दिग्दर्शनात पदार्पण, ही अभिनेत्री साकारणार ट्रॅजेडी क्वीनची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 17:07 IST

आपल्या निखळ सौंदर्याने आणि अदाकारीने सिनेप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मीना कुमारी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येणार आहे.

मीना कुमारी (Meena Kumari ) यांचं नाव आठवलं तरी डोळ्यांपुढं उभा राहतो तो बोलक्या डोळ्यांचा एक सुंदर चेहरा. आपल्या निखळ सौंदर्याने आणि अदाकारीने सिनेप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मीना कुमारी. दिल अपना प्रीत पराई’ मधली नर्स करूणा, ‘दिल एक मंदिर’ची सीता, ‘मेरे अपने’ मधील आई शिवाय पाकिजा, परिणीता अशासगळ्या भूमिका मीना कुमारी यांनी ताकदीने उभ्या केल्या आणि अजरामर केल्या. त्यांच्या कामासोबतच त्यांची पर्सनल लाइफही नेहमी चर्चेत राहिली. आता प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​अभिनेत्री मीना कुमारी यांच्या जीवनावर बायोपिक बनवणार आहेत.  मीडिया रिपोर्टनुसार, या बायोपिकमध्ये अभिनेत्री क्रिती सेनन मीना कुमारी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या चित्रपटाचे स्क्रिप्टिंग स्टेजवर असून त्यानंतर कास्टिंग केले जाईल. त्यानंतर मीना कुमारी यांच्या जीवनावरील बायोपिकचे चित्रीकरण होणार आहे. हा चित्रपट देखील मनीष मल्होत्रा ​​स्वतः दिग्दर्शित करणार आहे. त्याचबरोबर टी-सीरीज या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाद्वारे डिझायनर मनीष मल्होत्रा ​​देखील दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.

 मीना यांचं आय़ुष्य फारच वेदनादायी होतं. ज्यामुळे त्यांना ट्रॅजेडी क्वीन म्हटलं जात होतं. 'पाकीजा' रिलीज झाल्यानंतर तीन आठवड्यांनी मीना कुमारी गंभीरपणे आजारी पडल्या होत्या. त्या आयुष्यात इतक्या एकट्या झाल्या होत्या की, त्यांनी दारूचा आधार घेऊ लागल्या होत्या. हळूहळू त्यांनी दारूची सवय लागली. मीना कुमारी या फार सुंदर आणि तेवढ्याच लोकप्रिय होत्या. त्या प्रत्येकांना हव्याहव्याशा होत्या. त्या त्यांच्या काळात सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्यांनी हिंदी सिनेमात आपल्या काळात यशाचा एक इतिहास रचला होता. पण खऱ्या आयुष्यात त्या आधारासाठी झुरत राहिल्या. अखेर एकटेपणामुळे आणि दारूच्या सेवनामुळे त्यांचं निधन झालं. 

टॅग्स :मीना कुमारीमनीष मल्होत्रा