इंडियाज गॉट टॅलेंटचे आठे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किरण खेर, मलाईका अरोरा आणि करण जोहर हे या आठव्या पर्वातचे जज असणार आहेत. इंडियाज गॉट टॅलेंटचे सूत्रसंचालन भारती सिंग आणि हृत्विक धनजानी करणार आहे. हा शो २० ऑक्टोबर २०१८पासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री १० वाजता पाहायला मिळणार आहे. या पर्वाचे ब्रीदवाक्य आहे 'वो टॅलेंट ही क्या जो दुसरों के काम ना आए.' या पर्वात तुम्हाला ऐकलेल्या गोष्टी पुन्हा पहायला मिळण्याची शक्यता आहे. यावर्षीच्या कलांमध्ये टेक्नो आर्ट, सीआरपीएफ महिलांकडून करण्यात आलेल्या बाईक वरील कसरती, पाण्यातील आणि हवेतील कसरती, आकर्षक दृष्टीभ्रम, मल्लखांब आणि प्रथमच ३ डी प्रोजेक्शनसह होलोग्राफीक इंटरॲक्टिव्ह कला यांचा समावेश असेल. संपूर्ण देशभरांतून या स्पर्धेत कलाकार सहभागी होतात. त्यांची निवड केवळ त्यांच्या कौशल्यावर आधारीत असते.
'पटाखा' या चित्रपटातील 'हॅलो हॅलो' या गाण्यात मलायका अरोरा धमाकेदार परफॉर्मन्स दिला आहे. 'पटाखा' चित्रपटातील हे एकमेव गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे युट्यूबवर येताच खूप चांगला प्रतिसाद या गाण्याला मिळाला आहे. ९ लाखाहून अधिक प्रेक्षकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. गीतकार गुलजार यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत, तर रेखा भारद्वाज हिच्या आवाजात हे गाणे प्रेक्षकांना ऐकता येणार आहे. नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.