Join us

'एमटीव्ही रोडीज'चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 8:13 PM

भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक काळ चालणारा साहसी रिअॅलिटी शो असलेला एमटीव्ही रोडीज आता आपले सोळावे पर्व सुरू करत आहे.

भारतीय टेलिव्हिजन वरील सर्वाधिक काळ चालणारा साहसी रिअॅलिटी शो असलेला एमटीव्ही रोडीज आता आपले सोळावे पर्व सुरू करत असून रोडीजरियल हिरोजची सुरूवात १० फेब्रुवारी संध्याकाळी ७.०० वाजता एमटिव्ही वर होणार आहे. या नवीन सीझन मध्ये आता सर्व प्रेक्षकांना अनोखा अनुभव मिळणार आहे. रोडीज फेम रणविजय सिंघा पुन्हा एकदा सूत्रसंचालक आणि रिंग मास्टर म्हणून काम पाहणार असून प्रत्येक स्तरावर नवीन ट्वीस्ट आपल्याला पहायला मिळणार आहे. तर नेहा धुपिया,प्रिन्स नरूला, निखिल चिन्नप्पा आणि रफ्तार आपल्या टिम्सचे नेतृत्व करून १६ व्या पर्वांतआघाडी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. इतकेच नव्हे तर स्पर्धा अधिक बळकट करण्यासाठी भारतीय हॉकी टिमचा माजी कप्तान संदीप सिंग सुद्धा आपली एक टिम घेऊन रोडीज रियल हिरोजच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे.सोळाव्या सीझनसाठी उत्साही असलेला रणविजय म्हणतो ‘‘सर्वांत अधिक काळ चालणाऱ्या रिअॅलिटी शो चा भाग होताना आम्हाला आनंद होत आहे. मी या शो मध्ये एक स्पर्धक म्हणून सहभागी झालो, नंतर गॅंग लीडर आणि आता सलग दोन वर्ष मी मास्टर आहे म्हणजेच मला या सर्वांचा चांगला अनुभव आहे. या सिझनचा विषय पाहता मी अधिक उत्साही आहे कारण याधून मला देशभरांतील खऱ्या हिरोज च्या शक्तीचा अनुभव मिळेल व यांतील सर्वोत्कृष्‍ट जिंकेल.’’नेहा धुपिया म्हणते ‘‘रोडीज हा तरूणाईला एकत्र आणून त्यांच्यातील सर्वोत्कृष्‍ट बाहेर आणण्याचा एक सुंदर मंच आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर टिमवर्क, साहस, नाट्य आणि आनंद आहे. प्रत्येक सिझन मध्ये स्पर्धकांना अधिक चांगले मिळत असते. मी सुद्धा या सीझन ने खूपच उत्साही आहे कारण संदीप सिंग आमच्याबरोबर येत असल्याने व रियल हिरोज बरोबर मंच शेअर करत आहे. कारण या हिरोजनी त्यांच्या आयुष्यात निस्वार्थ आणि चांगले काम केले आहे.’’या सीझनचे शुटिंग हे दक्षिण भारतातील कन्नन पर्वतराजीतील मुन्नारच्या देवन पर्वतराजीत करण्यात आले असून पश्च‍िम घाटातील चिकमंगळूर येथील मुल्यनगिरी या सर्वोच्च शिखरावर करण्यात आलेले आहे. यामध्ये स्पर्धक केवळ त्यांच्या भिती बरोबरच मुकाबला करणार नाहीत तर येथील अतिशय कठीण अशा हवामानाशीही मुकाबला करणार आहेत व कठीण अशा टास्कही पूर्ण करणार आहेत. साहसाची आवड असणाऱ्या लोकांसाठी एक रोलर कोस्टर राईड असेल व जीवनभराचा एक अनुभव ठरणार आहे. 

टॅग्स :एमटीव्हीनेहा धुपिया