Mehmood Birthday :... आणि मेहमूद यांनी उगारला होता राजेश खन्ना यांच्यावर हात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 04:22 PM2018-09-29T16:22:46+5:302018-09-29T16:23:35+5:30
मेहमूद यांचे कॉमिक टायमिंग, संवाद म्हणण्याची पद्धत हे सगळे प्रेक्षकांना आजही भावते. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. मेहमूद यांनी बॉलिवूडमध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले. पडोसन, कुंवारा बाप, बॉम्बे टू गोवा, गुमनाम यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
मेहमूद यांचा आज वाढदिवस असून त्यांचा जन्म 29 सप्टेंबर १९३२ रोजी झाला. मेहमूद यांचे वडील मुमताज अली बॉम्बे टॉकिजमध्ये काम करायचे. घराच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मेहमूद मालाड ते विरार दरम्यान चालणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चॉकलेट विकायचे. लहानपणापासूनच मेहमूद यांना अभिनयात रस होता. वडिलांच्या ओळखीमुळे मेहमूद यांना १९४३ मध्ये बॉम्बे टॉकिजच्या किस्मत या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात मेहमूद यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती.
मेहमूद यांचे कॉमिक टायमिंग, संवाद म्हणण्याची पद्धत हे सगळे प्रेक्षकांना आजही भावते. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. मेहमूद यांनी बॉलिवूडमध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले. पडोसन, कुंवारा बाप, बॉम्बे टू गोवा, गुमनाम यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मेहमूद हे खूप चांगले अभिनेते असण्यासोबतच एक खूप चांगले गायक, निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मेहमूद यांनी 300 हून अधिक चित्रपटात काम केले होते. त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी ते ओळखले जात असले तरी खऱ्या आयुष्यात ते रागीट होते. त्यांनी एकदा तर सेटवर राजेश खन्ना यांच्यावर हात उगारला होता. जनता हवालदार या त्यांच्या चित्रपटामध्ये राजेश खन्ना काम करत होते. त्यावेळी राजेश खन्ना हे सुपरस्टार होते. त्यांनी आपल्या चित्रपटात काम करावे असे सगळ्यांना वाटत असे. मेहमूद यांच्या फार्म हाऊसवर जनता हवलदार या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी राजेश खन्ना सेटवर उशिरा सेट असत. त्यांच्यामुळे कधीच वेळेत चित्रीकरण सुरू होत नसे. या चित्रपटाचे मेहमूद दिग्दर्शक असण्यासोबत त्यात काम देखील करत होते. राजेश खन्ना यांच्या सतत उशिरा येण्याने त्यांना कित्येक तास सेटवर त्यांची वाट पाहावी लागत असे. त्यामुळे एकदा या गोष्टीवरून मेहमूद आणि राजेश खन्ना यांचा चित्रपटाच्या सेटवरच चांगलाच वाद झाला. त्यावेळी रागात मेहमूद यांनी राजेश खन्ना यांच्यावर हात उगारला होता.