Join us

मेरी आवाज ही पहचान है... लता दिदींच्या जयंतीनिमित्त विशेष लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 8:34 AM

स्वरकोकिला, कोणी सूरसमरागिणी, कोणी बुलबुल-ए-हिंद तर कोणी प्रत्यक्ष सरस्वती म्हणतं.

रंजू मिश्राहिंदी चित्रपट संगीताच्या मुकुटमणी भारतरत्न लता मंगेशकर आज आपल्यात असत्या तर त्या आपला ९४ वा वाढदिवस साजरा करत असत्या. मात्र गेल्या वर्षी ६ फेब्रुवारीला काळाने त्यांना आपल्यापासून हिरावून नेले. २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्य प्रदेशातील इंदोर येथे जन्मलेल्या या महान गायिकेने ३६ विविध भाषांमध्ये ५० हजारांहून अधिक गाणी गायली आणि जवळपास सात दशके आपल्या मखमली आवाजाच्या जादूने संगीतप्रेमींच्या हृदयावर राज्य केले. त्यांना आयुष्यात अनेक पुरस्कार आणि मोठ्या पदव्याही मिळाल्या. कोणी त्यांना स्वरकोकिला, कोणी सूरसमरागिणी, कोणी बुलबुल-ए-हिंद तर कोणी प्रत्यक्ष सरस्वती म्हणतं.

अभिनयाद्वारे झाली करिअरची सुरुवात 

लता मंगेशकर या जरी एक ज्येष्ठ गायिका होत्या आणि त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य संगीत साधनेत घालवले होते, पण त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात मात्र अभिनयापासून झाली. त्यांचे वडील मा. दीनानाथ मंगेशकर मराठी रंगभूमीवरील दिग्गज कलावंत होते. त्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षी लतादीदींनी वडिलांसोबत नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. यासोबतच त्यांनी वडिलांकडून संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. १९४२ मध्ये त्यांनी 'किती हसाल' या मराठी चित्रपटासाठी पहिले गाणे गायले होते, पण लतादीदींनी गायलेले गाणे त्यांच्या वडिलांनी चित्रपटातून काढून टाकले होते. अवघ्या १३ वर्षांच्या असताना अतिशय लहान वयात मा. दीनानाथ यांचे निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी दीदींवर आली. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. १९४२ मध्ये लतादीदींना 'पहिली मंगळागौर'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. पुढे त्यांनी 'माझे बाळ', 'चिमुकला संसार' (१९४३), 'गजाभाऊ' (१९४४), 'बडी माँ' (१९४५), 'जीवन यात्रा' (१९४६), 'छत्रपती शिवाजी' (१९५२) यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले.  १९४५ मध्ये, लतादीदींची संगीतकार गुलाम हैदर यांच्याशी भेट झाली. दीदींच्या गायनशैलीने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी चित्रपट निर्माते एस. मुखर्जी यांना 'शहीद' चित्रपटात दीदींना गाण्याची संधी देण्याची विनंती केली. काही कारणामुळे ते जमले नाही, पण १९४९ मध्ये 'महल' चित्रपटातील 'आएगा आने वाला...' या गाण्याने असा चमत्कार केला की, लतादीदींना मागे वळून पाहण्याची संधी मिळाली नाही. प्रत्येक युगात पडद्यावर अभिनेत्रींचे चेहरे बदलत राहिले, पण आवाज तोच राहिला   

२००१ मध्ये मिळाला भारतरत्नलता मंगेशकर यांना त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत चार वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७२ मध्ये 'परिचय', १९७५ मध्ये 'कोरा कागज' आणि १९९० मध्ये 'लेकिन' या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. वयाच्या ६१ व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या त्या एकमेव गायिका आहेत. याशिवाय त्यांना १९६३ मध्ये पद्मभूषण, १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, १९९९ मध्ये पद्मविभूषण आणि २००१ मध्ये देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आले. 'भारतरत्न' आणि 'दादा साहेब फाळके' पुरस्कार मिळवणाऱ्या त्या चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला आहेत. त्यांच्याशिवाय सत्यजित रे यांना चित्रपटसृष्टीत हे दोन्ही सन्मान मिळाले आहेत. लता मंगेशकर यांच्या नावावर १९७४ मध्ये जगात सर्वाधिक गाणी गाण्याचा गिनीज बुक रेकॉर्डही आहे.

सुरसम्राज्ञीशी संबंधित खास गोष्टी -n लता मंगेशकर यांनी गाण्याला पूजा मानले आणि नेहमी अनवाणी गाणे गायले. रेकॉर्डिंग रूमच्या बाहेरच त्या चप्पल काढायच्या.n ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार त्यांना बहीण मानत होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सायरा बानो यांनी आपल्या पोस्टमध्ये याचा उल्लेख करताना लिहिले होते की, बॉलिवूडचे कोहिनूर दिलीप साहब आणि लता मंगेशकर यांच्यात भावा-बहिणीचे नाते होते, जे शेवटपर्यंत कायम राहिले. व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून लता मंगेशकर राखी बांधण्यासाठी त्यांच्या घरी यायच्या.n देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना आपल्या 'ऐ मेरे वतन के लोगों...' या गाण्याने रडवणाऱ्या लतादीदींनी त्यापूर्वी हे गाणे गाण्यास नकार दिला होता. मात्र या गाण्याचे निर्माते कवी प्रदीप यांनी त्यांना गाण्यासाठी तयार केले होते.n गाण्याव्यतिरिक्त सुरांची राणी असलेल्या लतादीदींना फोटोग्राफी आणि स्वयंपाकाची आवड होती. त्यांना क्रिकेट, फुटबॉल आणि टेनिस हे खेळही आवडायचे. गायिका असण्यासोबतच त्या संगीतकारही होत्या. त्यांनी 'आनंदघन' या नावाने संगीत दिग्दर्शन केले. चित्रपट निर्मितीतही त्यांनी हात आजमावला. 'लेकिन' हा चित्रपट त्यांच्या बॅनरखाली बनला होता.

 

टॅग्स :लता मंगेशकरमुंबईबॉलिवूड