मीटू मोहिमेअंतर्गत साजिद खानवर झालेल्या गैरवर्तनाच्या आरोपांनी खळबळ माजली आहे. एकापाठोपाठ एक अनेक महिलांनी साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. याच आरोपांमुळे साजिदला ‘हाऊसफुल 4’मधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. साजिदची बहीण फराह खान आणि चुलत भाऊ फरहान अख्तर यांनीही साजिदने चूक केली असेल तर त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतील, असे म्हटले आहे. याचदरम्यान अभिनेत्री अमृता पुरी हिने ट्विट करून आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
यानंतर अमृता व फरहान यांच्यात ट्विटरवर चांगलीच जुंपली. फरहानचे हे ट्विट बघून अमृताही सणकली. ‘माझे ट्विट थेट तुझ्याबद्दल नव्हते़ मग तुला ते इतके का लागले? माझ्या ट्विटचा अशा पद्धतीने अर्थ लावणे मुळीच योग्य नाही. मी चूक असेल तर माफी. पण साजिदच्या कृत्यांबद्दल सगळेच जाणतात. असे असूनही यामुळे अनेकांना धक्का बसतो, हे मात्र मी पचवू शकले नाही,’असे यावर अमृता पुरी म्हणाली.आता अमृता पुरी व फरहान अख्तर यांच्यापैकी कोण खरं बोलतय, ते लवकरच कळेल.