Join us

#MeToo: आलोकनाथची सून अशिता धवन म्हणाली, प्रत्येक माणसामध्ये असतो दानव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 09:54 IST

अभिनेत्री अशिता धवनने आलोकनाथ यांना सपोर्ट केला आहे. विनता यांच्यावर टीका करत म्हणाली की, त्या 20 वर्षांपासून शांत का होत्या?

ठळक मुद्देविनता यांना सपोर्ट नाही करणार - अशिता धवनप्रत्येक माणूस करतो चूक - अशिता धवन

लेखिका व निर्मात्या विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रेप केल्याचा आरोप केला आहे. विनताच्या पोस्टनंतर सिने अ‍ॅण्ड आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सीआयएनटीएए (सिंटा)ने आलोकनाथ यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. या प्रकरणात आता टिव्हीवरील बिदाई मालिकेत आलोकनाथ यांच्या सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अशिता धवनने आलोकनाथ यांना पाठिंबा दिला आहे. एका वाहिनीसोबत बोलताना अशिता म्हणाली की, याप्रकरणी मी विनता यांना सपोर्ट नाही करणार. जर त्यांना यावर स्टॅण्ड घ्यायचा होता तर त्यांनी त्यावेळीच घ्यायला हवा होता. 20 वर्ष खूप मोठा काळ असतो. वीस वर्षात तर गुगलवरील बऱ्याच गोष्टी निघून जातात.

ती पुढे म्हणाली की, मला असे म्हणायचे नाही की त्या हे सगळे पब्लिसिटी करत आहेत. मात्र मला वाटते की असे आरोप करण्यात काहीही अर्थ नाही. एवढ्या मोठ्या कालावधीनंतर असे मुद्दे बाहेर आणल्यानंतर त्यावर कोणालाही काहीच बोलावसे वाटणार नाही. हा मुर्खपणा आहे.

आलोक यांच्यासोबतचा अनुभवाबाबत विचारले असता अशिता म्हणाली की, मला आलोकनाथ यांची वर्तवणुक कधी चुकीचे वाटले नाही. मी त्यांना बिदाई मालिकेपासून ओळखते. मी त्यांचा चांगला व वाईट असा दोन्ही काळ पाहिला आहे. प्रत्येक माणूस चुक करतो. प्रत्येक माणसामध्ये दानव असतो. लोक म्हणत आहेत की विनताची अडचण असेल म्हणून ती काही बोलू शकली नाही. पण ती निर्माती होती. एवढ्या मोठ्या मालिकेची निर्मिती करत होत्या. त्यात त्यांच्यासोबत त्यावेळी बरेच लोक होते. अशात आता हा मुद्दा उपस्थित करणे चुकीचे आहे. मी आलोकनाथ यांना त्यांच्या चुका मान्य करून मित्र मानले आहे. आमच्या दोघांमध्ये भांडणे झाली पण त्याचवेळी त्यांना मी ते सांगितले. नंतर सोशल मीडियावर पोस्ट केले नाही.

अशिताच्या मते आलोकनाथ यांना वीस वर्षापूर्वीच बॅन करायला हवे होते. आता कोणाची इमेज खराब करून काय फायदा होणार आहे.

टॅग्स :मीटूआलोकनाथ