Join us

#MeToo:आलोक नाथ यांना ‘जोर का झटका’! ‘सिन्टा’चे सदस्यत्व रद्द!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 10:15 AM

होय, आलोक नाथ यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर   सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिन्टाने कठोर कारवाई करत आलोक नाथ यांचे सदस्यत्व रद्द केले.

ठळक मुद्देविनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.विनता नंदा यांच्याशिवाय अभिनेत्री संध्या मृदृल हिनेही आलोक नाथवर गैरवर्तनाचा आरोप केला होता.

‘मीटू’ मोहिमेने अख्खे बॉलिवूड हादरवून सोडले असताना आज ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांना एका मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागले. होय, आलोक नाथ यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर   सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिन्टाने कठोर कारवाई करत आलोक नाथ यांचे सदस्यत्व रद्द केले. सिन्टाने काही तासांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट जारी करत, या निर्णयाची माहिती दिली.‘आलोक नाथ यांच्यावर अनेक महिलांनी केलेल्या लैंगिक शोषण  व गैरवर्तनाच्या आरोपानंतर सिन्टाच्या एक्झिक्युटीव्ह कमेटीने त्यांना असोसिएशनमधून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे सिन्टाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी सिन्टाने आलोक नाथ यांना नोटीस बजावले होते. याचे उत्तर देताना आलोक नाथ यांनी आपल्यावरचे सर्व आरोप धुडकावून लावले होते.

विनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मद्यात काही तरी मिसळून आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला होता. आलोक नाथ यांच्या पत्नीलाही याबाबत आपण माहिती दिली होती. मात्र तिने या प्रकरणात ती कुठलीच मदत करू शकणार नसल्याचे सांगत आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते, असा दावाही विनता नंदा यांनी केला होता. विनता नंदा यांच्याशिवाय अभिनेत्री संध्या मृदृल हिनेही आलोक नाथवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. याशिवाय अभिनेत्री  नवनीत निशानने देखील आलोक नाथ यांच्या वागण्याला कंटाळून मी त्यांच्या कानफटात लगावली होती असे सांगितले होते. ‘हम साथ साथ ह’ै या चित्रपटाच्या टीममधील एका महिला क्रू सदस्याने आलोक नाथ यांच्या वागणुकीमुळे तिला आलेल्या वाईट अनुभवाविषयी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

टॅग्स :आलोकनाथ