‘तारा’ या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या व लेखिका विनता नंदा यांनी अभिनेते आलोक नाथ यांच्यावर केलेल्या बलात्काराच्या आरोपांनी खळबळ माजली आहे. आलोक नाथ यांनी या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र सिने अॅण्ड आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सीआयएनटीएएने (सिंटा) या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत, आलोक नाथ यांना कारणे दाखवा नोटीस जारी केले आहे.१९९४ मध्ये बॉलिवूड व टीव्हीच्या संस्कारी अभिनेत्याने माझ्यावर बलात्कार केला होता, असा आरोप विनता नंदा यांनी केला आहे. या प्रकरणाबद्दल त्यांनी एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टची गंभीर दखल घेत सीआयएनटीएएचे सुशांत सिंह यांनी ट्विट करत, आलोकनाथ यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
#MeToo: बलात्काराच्या आरोपानंतर आलोक नाथ यांना ‘सिंटा’ची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 12:10 IST