Join us

#MeToo: कंगना रानौतचा हृतिक रोशनला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 6:59 PM

तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेचे वादळ आले असून यात एकानंतर मोठी नावे समोर येत आहेत.

ठळक मुद्देविकास बहलसोबत जे काही होत आहे ते अगदी योग्य आहे - कंगना रानौत

तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेचे वादळ आले असून यात एकानंतर मोठी नावे समोर येत आहेत. तनुश्री दत्ताने 2008 मध्ये ‘हॉर्न ओके’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केला आहे. यानंतर बॉलिवूडमधील अनेक महिला सेलिब्रेटी पुढे आल्या असून त्या आपले अनुभव शेअर करत आहेत. क्वीन चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल याचेही नाव यामध्ये आले आहे. क्रू मेम्बरने आपल्याशी लैंगिक गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केला आहे. तसेच अभिनेत्री कंगना रणौतनेही विकास बहलसोबत आलेले भयानक अनुभव शेअर केले आहेत. विकास बहल फँटम फिल्म्सचा सहसंस्थापक होता. हे प्रोडक्शन हाऊस बंद करण्यात आले आहे. या आरोपांमुळे विकास बहलला सुपर 30 चित्रपटातून माघार घ्यावी लागली आहे.

कंगनाने एका मुलाखतीत विकास बहलबद्दल सांगितले की, ‘विकास बहलसोबत जे काही होत आहे ते अगदी योग्य आहे. आपल्या इंडस्ट्रीत असे अनेक लोक आहेत ज्यांना महिलांशी कसे वागायचे कळत नाही. ते त्यांचा छळ करतात. त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. पुढे बोलताना तिने अभिनेता हृतिक रोशनला टोला मारला. ती म्हणाली की, ‘जे लोक आपल्या पत्नीला घेऊन मिरवतात आणि प्रेयसीला लपवून ठेवतात त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे’. हा टोला हृतिकला मारले असल्याचेदेखील कंगनाने कबूल केले. हृतिक आणि कंगनामधील वाद बॉलिवूड आणि प्रसारमाध्यमांमध्ये चांगलाच गाजला होता. ‘क्रिश 3’ चित्रपटादरम्यान हृतिक आणि आपल्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता. मात्र हृतिकने कंगना खोटे बोलत असल्याचे सांगितले होते. 

टॅग्स :कंगना राणौतहृतिक रोशनमीटू