मीटू मोहिमेअंतर्गत बॉलिवूडच्या ११ दिग्गज महिलांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या कुणावरही लैंगिक शोषणाचे वा गैरवर्तनाचे आरोप आहेत, जे या आरोपात दोषी आहेत, अशा कुठल्याही व्यक्तीसोबत काम न करण्याचा निर्णय या महिलांनी घेतला आहे. या ११ महिलांमध्ये अलंकृता श्रीवास्तव, आमिर खानची पत्नी किरण राव, एकता कपूर, कोंकणा सेन शर्मा , नंदिता दास, नित्या मेहरा, गौरी शिंदे, रिमा कागती, सोनाली बोस, झोया अख्तर, रूची नारायण अशा बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज महिलांचा समावेश आहे.
#MeToo: बॉलिवूडच्या या ११ महिलांनी घेतला एक मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 8:49 PM