सध्या सुरु असलेल्या #MeToo मोहिमेमुळे बॉलिवूडमध्ये चांगलेच वादळ आले आहे. दिग्दर्शक निर्माता साजिद खानवर एक नाही तर तीन महिलांनी लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले आहे. यानंतर अक्षय कुमारने हाऊसफुल 4चे शूटिंग थांबवण्यात यावे अशी विनंती निर्मात्यांकडे ट्विटरवरून केली होती. कारण या सिनेमाचा दिग्दर्शन साजिद खान करतो आहे. लैंगिक अत्याचाराचे आरोप असणाऱ्यांसोबत मी काम करणार नाही अशी भूमिका अक्षयने घेतली आहे.
यानंतर साजिदने या सिनेमाचे दिग्दर्शन न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. हाऊसफुल 4 मध्ये अक्षय कुमारची महत्त्वाची भूमिका आहे. यात नाना पाटेकरसुद्धा काम करतायेत.
साजिद खानवर एक्स-असिस्टंट सलोनी चोप्रा,अभिनेत्री रिचेल वॉईट आणि जर्नलिस्ट करिश्मा या तिघींचा समावेश आहे. गंभीर आरोप केले आहेत. सलोनी चोप्राने म्हटले आहे. जर्ललिस्ट करिश्मानेही साजिदचा खरा चेहरा जगापुढे आणला आहे. एकदा मी मुलाखत घ्यायला साजिदच्या घरी गेले होते. मुलाखत झाल्यावर मी महिलांना कशाप्रकारे संतुष्ट करतो, हे साजिद मला सांगू लागला. डिव्हिडी घ्यायच्या बहाण्याने तो आत गेला़ बाहेर आला तेव्हा त्याची पॅन्ट उघडी होती. मी तिथून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याने मला पकडले आणि बळजरीने किस करू लागला, असे करिश्माने लिहिले आहे.
अक्षय प्रमाणेच आमिर खाननेदेखील #MeToo मोहिमेला पाठिंबा दर्शवत मुघल सिनेमातून काढता पाय घेतला आहे. आमिरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, लैंगिक अत्याचार ही गोष्ट चुकीची असून याचे कधीच समर्थन करता येणार नाही. आमिर खान प्रॉडक्शन मध्ये या गोष्टींना किंवा असे करणाऱ्या लोकांना कधीच थारा देण्यात आलेला नाही.